'या' ५ गोष्टींचं पाणी पिऊन नेहमी रहा निरोगी, हेल्थ एक्सपर्टनी दिला खास सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 11:09 AM2024-06-10T11:09:57+5:302024-06-10T11:11:19+5:30
Magical Water : आज आम्ही तुम्हाला पाण्यात काही गोष्टी टाकून किंवा काही खास गोष्टींचं पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.
Magical Water : पाणी पिणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉ़क्टरही दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. रोज सकाळी साधं पाणी प्यायल्याने अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला पाण्यात काही गोष्टी टाकून किंवा काही खास गोष्टींचं पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत. सकाळी तर जर या पाण्याचं सेवन केलं तर अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.
हेल्थ एक्सपर्ट उर्वशी अग्रवाल यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत काही खास पाण्यांची माहिती दिली आहे. हे पाणी तुम्ही रोज सकाळी सेवन कराल तर तुम्हाला खूपसारे फायदे मिळतील.
भेंडीचं पाणी
भेंडीच्या पाण्यामध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन्स असतात. हे पाणी रोज प्यायल्याने रक्तातील शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. पचनक्रिया सुधारते आणि त्वचा हेल्दी राहण्यास मदत मिळते.
आल्याचं पाणी
आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आल्याचं पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील सूज कमी होते. या पाण्याने मळमळ होण्याची समस्या दूर होते तसेच रोगप्रतिकारक शक्तही वाढते.
दालचीनीचं पाणी
दालचीनी हा एक बुहुउपयोगी मसाला आहे. यात भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. रक्तातील शुगर लेव्हल योग्य ठेवण्यास याच्या पाण्याची मदत मिळते. तसेच याच्या पाण्याने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. या पाण्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत मिळते.
पुदीन्याचं पाणी
पुदीन्याचं पाणी प्यायल्याने पचन चांगलं होतं. डोकेदुखी दूर होते आणि श्वासासंबंधी समस्यांचा धोका कमी होतो. उन्हाळ्यात शरीरा डिटॉक्स करण्यासाठी हे चांगलं पाणी मानलं जातं.
पिंपळीचं पाणी
पिंपळीचं पाणी प्यायल्याने श्वसनासंबंधी समस्या दूर होतात. पचन चांगलं होतं आणि मेटाबॉल्जिम मजबूत होतं. ज्यामुळे तुम्हाला वेगाने वजन कमी करण्यास मदत मिळते.