डायटिशिअनने सांगितले रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी पिण्याचे फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:41 AM2024-06-21T10:41:44+5:302024-06-21T10:47:13+5:30
Ajwain Water Benefits : ओव्याचं पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्याल तर तुम्हाला खूपसारे फायदे मिळतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
Ajwain Water Benefits : ओवा हा एक भारतीय किचनमधील महत्वाचा मसाला मानला जातो. बरेच लोक ओवा मुखवास म्हणून खातात. तसेच ओव्याचा वेगवेगळ्या पदार्थांमध्येही टेस्ट वाढवण्यासाठी वापर केला जातो. तसेच ओव्याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पचन चांगलं होण्यासोबतच ओव्याच्या पाण्याने अनेक गंभीर समस्यांपासून बचाव होतो. ओव्याचं पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्याल तर तुम्हाला खूपसारे फायदे मिळतात. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
डायटिशिअन रिची शहा यांनी इन्स्टावर यासंबंधी एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात त्यांनी ओव्याच्या पाण्याचे फायदे सांगितले आहेत.
ओव्याचं पाणी पिण्याचे फायदे
- रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील कफ बाहेर निघतो आणि सर्दी-पडसाही बरा होतो. अनेकदा ओव्याच्या पाण्याची वाफही फायदेशीर ठरते.
- ओव्याने पचनतंत्र मजबूत राहतं. सूंठ आणि जिऱ्यासोबत ओव्याचं पाणी उकडून प्यायल्याने पचन चांगलं होतं. ओव्याने डायजेस्टिव सिस्टीममधील एझांइम रिलीज करण्यास मदत मिळते. तसेच ओव्याने ब्लोटिंगची समस्याही दूर होते.
- दालचीनी पावडर टाकून ओव्याचं पाणी प्यायल्याने कोणत्याही फ्लूपासून बचाव होण्यास मदत मिळते.
- पावसाळ्यात रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यायल्याने डायरियापासूनही बचाव होतो.
- ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचं पाणी प्यावं. कारण याने वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच या पाण्याने बॉडी डिटॉक्सही होते.
- ओव्याचा वापर डाळ, भाजी, चटणींमध्येही करू शकता. याने जेवणाची टेस्टही वाढेल आणि पोटाच्या समस्याही दूर होतील.