काळ्या चण्यांपेक्षा काबुली चणे अधिक फायदेशीर, डायटिशिअनने सांगितले फायदे आणि किती करावं सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:09 AM2024-10-18T10:09:07+5:302024-10-18T10:15:13+5:30

Kabuli Chane Benefits : डायटिशिअन मिरांडा गालती यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, काबुली चण्यांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात. कारण यात फायबर आणि प्लांट बेस्ड प्रोटीन अधिक प्रमाणात असतं.

Dietitian tells chickpea is more powerful than black gram know the benefits | काळ्या चण्यांपेक्षा काबुली चणे अधिक फायदेशीर, डायटिशिअनने सांगितले फायदे आणि किती करावं सेवन!

काळ्या चण्यांपेक्षा काबुली चणे अधिक फायदेशीर, डायटिशिअनने सांगितले फायदे आणि किती करावं सेवन!

Kabuli Chane Benefits : जास्तीत जास्त घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी काळ्या चण्यांचा अधिक वापर केला जातो. काळे चणे आरोग्यासाठी फायदेशीर असतातच. मात्र, काबुली चणे अनेक दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतात. न्यूट्रिशन जर्नलमध्ये प्रकाशित स्टडीनुसार, काबुली चण्यांमध्ये अधिक पोषक तत्व असतात जे आरोग्याला अधिक फायदा देतात. डायटिशिअन मिरांडा गालती यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, काबुली चण्यांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात. कारण यात फायबर आणि प्लांट बेस्ड प्रोटीन अधिक प्रमाणात असतं. 

काबुली चणे खाण्याचे फायदे

फूड एक्सपर्टने सांगितलं की, काबुली चणे प्रोटीन, हेल्दी फॅट आणि भाज्यांसोबत खाल्ले जाऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं, आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं, तसेच वजन कमी करण्यासही मदत मिळते. 

कॅन्सरचा धोका होतो कमी 

हार्वर्ड टी.एच. के नुसार, वेगवेगळ्या स्टडीमधून समोर आलं आहे की, काबुली चण्यांच्या नियमित सेवनाने कोलनवरील सूज, हृदयरोग, कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. 

एका दिवसात किती करावं सेवन?

तुम्ही एका दिवसात कमीत कमी एकावेळी 28 ग्रॅम काबुली चण्यांचं सेवन करू शकता. याची काळजी घ्या की, एका दिवसात तुम्ही 70 ग्रॅमपेक्षा जास्त काबुली चणे खाऊ नये. असं केल्याने डायजेशन बिघडू शकतं. 

काबुली चणे खाण्याचे इतर फायदे

काबुली चण्यांमध्ये कॅल्शिअम, झिंक आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. जे हाडांना मजबूत ठेवण्याचं काम करतात. तसेच काबुली चण्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. या फायबरने बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते. तसेच पचनक्रियाही चांगली होते. 

Web Title: Dietitian tells chickpea is more powerful than black gram know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.