पावसाळ्यात गॅस - अ‍ॅसिडिटी दूर करेल 'या' डाळीचं पाणी, डायटिशिअनने सांगितली पिण्याची पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 09:28 AM2024-06-25T09:28:24+5:302024-06-25T09:30:19+5:30

Moong Dal Water : बऱ्याच लोकांना गॅस किंवा अ‍ॅसिडिटी, पोट फुगणं, पोट दुखणे, जुलाब अशा समस्या होतात. अशात पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी एक खास उपाय सांगितला आहे.

Dietitian tells drinking Moong dal water during monsoons will remove gas, acidity and bloating | पावसाळ्यात गॅस - अ‍ॅसिडिटी दूर करेल 'या' डाळीचं पाणी, डायटिशिअनने सांगितली पिण्याची पद्धत

पावसाळ्यात गॅस - अ‍ॅसिडिटी दूर करेल 'या' डाळीचं पाणी, डायटिशिअनने सांगितली पिण्याची पद्धत

Moong Dal Water : वातावरणात बदल झाला की अनेकांना पचनासंबंधी समस्या होतात. खासकरून पावसाळ्या तर पचन तंत्र स्लो झालेलं असतं. त्यामुळेच एक्सपर्ट हलकं आणि शिजवलेलं, कमी तेलाचं खाण्याचा सल्ला देतात. तरीही बऱ्याच लोकांना गॅस किंवा अ‍ॅसिडिटी, पोट फुगणं, पोट दुखणे, जुलाब अशा समस्या होतात. अशात पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डायटिशिअन श्वेता पांचाल यांनी एक खास उपाय सांगितला आहे. श्वेता पांचाल यांनी या दिवसांमध्ये पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मूग डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच ते कसं प्यावं हेही सांगितलं आहे.

श्वेता पांचाल यांनी सांगितलं की, हा एक सोपा, हेल्दी आणि आयुर्वेदिक उपाय आहे. पावसाळ्यात जास्तीत जास्त लोकांना ब्लोटिंग, गॅस आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होते. या समस्या दूर करण्यासाठी मूग डाळ शिजवताना त्यात थोडं जास्त पाणी टाका. हे पाणी गाळून ग्लासमध्ये काढा. यात थोडं तूप, हळद आणि काळे मिरे पावडर टाका. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. याने पोटासंबंधी समस्या दूर होतील.

मूग डाळीच्या पाण्याचे फायदे

लठ्ठपणा कमी होतो

आजकाल लोकांना लठ्ठपणाची समस्या जास्त होत आहे. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करायचा असेल तर मूग डाळीच्या पाण्याचं सेवन सुरू करा. याने मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते.

विषारी पदार्थ बाहेर पडतील

मूग डाळीचं पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. सोबतच या डाळीचं पाणी प्यायल्याने लिव्हर, गॉल ब्लॅडर, रक्त आणि आतड्यांची स्वच्छताही होते.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

मूग डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला डायबिटीस असलेल्या रूग्णांना दिला जातो. कारण मूग डाळीचं पाणी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबतच मूग डाळ ब्लड ग्लूकोजला नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. ज्याने डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.

डेंग्यूपासून बचाव

पावसाळ्यात डासांची समस्या वाढते. या दिवसात डेंग्यू होण्याचा धोकाही जास्त असतो. या डाळीचं पाणी सेवन करून इम्यून सिस्टम बूस्ट होतं, ज्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजारापासून बचाव होतो.

लहान मुलांसाठी फायदेशीर

मूग डाळीच्या पाण्यात अनेकप्रकारचे पोषक तत्व असतात, जे लहान मुलांसाठी फार फायदेशीर असतात. सर्वात खास बाब ही आहे की, या डाळीचं पाणी सहजपणे पचतं. या डाळीने लहान मुलांची इम्यून पॉवर वाढते आणि त्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून त्यांचा बचाव होतो.

Web Title: Dietitian tells drinking Moong dal water during monsoons will remove gas, acidity and bloating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.