उपवास की वजन कमी होण्यासाठी उपाशी राहणं?; डायटिशियन रुजुता दिवेकरने सांगितला यातील फरक
By Manali.bagul | Published: October 22, 2020 03:19 PM2020-10-22T15:19:31+5:302020-10-22T15:30:55+5:30
Health Tips in Marathi : पारंपारिक उपवास करणं आणि बारिक होण्यासाठी उपाशी राहणं यातील फरक भारतातील प्रसिद्ध डायटिशियन रुजूता दिवेकर यांनी सांगितला आहे.
सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत. देशभरात हिंदू धर्मातील लोक नवरात्रीच्या काळात उपवास करतात. नवरात्रीप्रमाणेच इतर धार्मीक सणांच्या दिवशी उपवास केले जात. काहीजण परंपरांना अनुसरून देवासाठी उपवास करतात. तर काहीजण पोटाला आराम मिळावा म्हणून किंवा वजन कमी करण्यासठी उपवास करतात. पारंपारिक उपवास करणं आणि बारिक होण्यासाठी उपाशी राहणं यातील फरक भारतातील प्रसिद्ध डायटिशियन रुजूता दिवेकर यांनी सांगितला आहे.
कोणत्याही धर्माचा पारंपारिक उपवास करताना आपण रोज जे अन्न खातो ते पदार्थ न खाता वेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो किंवा अनेकजण फळं खाऊन, पूर्णपणे उपाशी राहून उपवास करतात. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहिल्यास शरीरातील कॅलरीज कमी होणं हेच उद्दिष्ट असते. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन कमी होतं. इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting), OMAD करण्याला लोक प्राध्यान्य देतात.
पारंपारिक उपवासासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा फराळात समावेश करतात. काही उपवास असेही असतात जे आनंद साजरा करण्यासाठी केले जातात. साधारपणपणे साबुदाणा वडा, खिचडी, सिंगाड्याची पुरी,वरीचे तांदूळ असे पदार्थ तयार केले जातात. वजन कमी करण्यासाठी फास्टींगमध्ये आहारात पोषक तत्वांचा समावेश असणं आवश्यक आहे. कार्ब्स, प्रोटीन्स, फायबरर्स असलेल्या पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात असावा. जेणेकरून शरीराला पोषण मिळेल आणि जास्त चरबी जमा होणार नाही. स्वदेशी लसीची शेवटची चाचणी पुढच्या महिन्यात सुरू होणार, फेब्रुवारीत Covaxin येणार?
पारंपारिक उपवासासाठी अनेक नियम पाळावे लागतात. कारण या उपवासांसाठी शरीला फायदा मिळण्याच्या तुलनेत देवाप्रती प्रेम, त्याग याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जातं. उपवासांबाबत घरातील कोणत्याही व्यक्तीकडून तुम्हाला माहिती मिळते. पण वेट लॉस फास्टींगबाबत डायटीशियन, जाहिराती, लेख किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते. वैज्ञानिकांची कमाल! शोधला मानवी शरीरातील एक नवीन अवयव, 'असा' होईल फायदा