विश्वासही बसणार नाही असे विचित्र आजार, कुणाची होते आग लावण्याची इच्छा तर कुणी करतं एकतर्फी प्रेम!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 10:20 AM2020-02-06T10:20:14+5:302020-02-06T10:25:54+5:30
खूळ लागणे किंवा वेडसरपणा हा एकप्रकारचाच नसतो. याला इंग्रजीत मेनिया असं म्हणतात. म्हणजे यात लोकांना काही खासप्रकारच्या गोष्टी करण्याचं खूळ लागतं.
(Image Credit : itspsychology.com)
खूळ लागणे किंवा वेडसरपणा हा एकप्रकारचाच नसतो. याला इंग्रजीत मेनिया किंवा डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे यात लोकांना काही खासप्रकारच्या गोष्टी करण्याचं खूळ लागतं. म्हणजे याने पीडित लोकांना चोरी करण्याची, सतत एखाद्या वस्तूला आग लावण्याची, तर कधी सतत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होते. हे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार आहेत.
या आजाराने ग्रस्त व्यक्तीसाठी ते जे करतात ते करणं भाग पडतं. जसं असं करण्यास त्यांना कुणी रोखलं तर त्यांना अस्वस्थता, असहजता आणि नर्व्हसनेस होऊ लागते. त्यांना ही विचित्र कामे करण्याची खुमखुमी लागते. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना हे माहीत असतं की, ते जे काम करत आहेत ते चुकीचं आहे. बरं मेनियाचा प्रभाव २४ तास राहत नाही. काही वेळासाठी काही ठराविक वेळेतच या गोष्टी करण्याची त्यांची इच्छा होत असते. आज आम्ही तुम्हाला काही खास मेनियाबाबत सांगणार आहोत.
इरोटोमेनिया
(Image Credit : brightquest.com)
इरोटोमेनिया हा एकप्रकारचा डिसऑर्डर असतो. ज्यात ग्रस्त व्यक्त त्याच्या वरच्या स्टेटसच्या व्यक्तीसोबत प्रेम करू लागतो. सोबतच त्याच्या अॅक्टिविटीमध्ये ही व्यक्ती सहभागी होऊ लागते. हे सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर हे एकतर्फी प्रेम असतं. ज्यात एक सामान्य व्यक्ती वरच्या क्लासमधील व्यक्तीवर प्रेम करू लागते. मेनियाने ग्रस्त व्यक्तींना समजावून सांगितले तरी सुद्धा त्यांना समजत नाही.
डिप्सोमेनिया
हा मद्यसेवन करण्यासंबंधीचा डिसऑर्डर आहे. याने ग्रस्त व्यक्ती जेव्हा मद्यसेवन करतो तेव्हा दिवसभर करतो आणि अनेक दिवस असंच करतो. नंतर पिणं बंद करतो. पुन्हा प्यायला सुरूवात करतो. ही स्थिती या व्यक्तीच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येते. ही स्थिती वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळे असू शकते.
पायरोमेनिया
या डिसऑर्डरमध्ये व्यक्तीला आग लावण्याचं मन होत असतं. त्यांना हे माहीत असतं की, आग लावणं धोकादायक असू शकतं, पण तरी ते स्वत:ला असं करण्यापासून रोखू शकत नाही. त्यांना संधी मिळताच ते कोणत्याही वस्तूला आग लावतात. पण या डिसऑर्डरने ग्रस्त व्यक्ती पुन्हा पुन्हा असं करत नाहीत, पण त्यांच्या मनात असं करण्याचा विचार नेहमी येत राहतो.
निंफोमेनिया
हा एक असा डिसऑर्डर आहे ज्यात व्यक्तीची शारीरिक संबंध ठेवण्याची तीव्र इच्छा होते. निंफोमेनिया सामान्यपणे महिलांमध्ये अधिक आढळून येतो आणि यात अधिक जास्त कामेच्छा असते. यालाच सवय सुद्धा मानलं जातं. जेव्हा हा मेनिया पुरूषांमध्ये होते तेव्हा त्याला सॅटरायटिस म्हटलं जातं. याने पीडित लोक त्यांच्या लैंगिक इच्छेवर कंट्रोल ठेवू शकत नाही.