आंबट ढेकरीसोबत तोंडात पाणी का येतं? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 10:10 AM2024-08-05T10:10:31+5:302024-08-05T10:11:25+5:30

आज आम्ही तुम्हाला मळमळ होण्यासोबतच आंबट ढेकर येण्याच्या कारणांबाबत सांगणार आहोत.

Digestive disorders reasons and prevention | आंबट ढेकरीसोबत तोंडात पाणी का येतं? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय...

आंबट ढेकरीसोबत तोंडात पाणी का येतं? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय...

अनेकांना मळमळ होण्यासोबत तोंडात पाणी येऊ लागतं. काही लोकांना पचन तंत्र खराब असल्याने आंबट ढेकरसोबत तोंडात अन्न येणे, मळमळ होणे, तोंडात पाणी येणे अशा समस्या होतात. ही पचनासंबंधी समस्या आहे. अशात आज आम्ही तुम्हाला मळमळ होण्यासोबतच आंबट ढेकर येण्याच्या कारणांबाबत सांगणार आहोत.

गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिजीज

ही एक पचनासंबंधी समस्या आहे आणि या स्थितीत पोटातील अ‍ॅसिड परत इसोफेगसमध्ये येतं, ज्यामुळे मळमळ आणि तोंडात लाळ जास्त येते.

पोटात अल्सर

पोटात अल्सर असल्याने देखील मळमळ आणि तोंडात पाणी येणे अशा समस्या होतात, ही समस्या खासकरून जेवण झाल्यावर होते. यात पोटात नेहमीच वेदना होतात.

इरिटेबल बाउल सिंड्रोम

इरिटेबल बाउल सिंड्रोममुळे सुद्धा मळमळ आणि तोंडात पाणी येऊ शकतं. ही आतड्यांसंबंधी समस्या आहे. यानेही व्यक्तीच्या पोटात दुखणे आणि मळमळ होणे अशी समस्या होते.

जास्त चिंता आणि तणाव

जास्त चिंता आणि तणावाचा प्रभाव पचन तंत्रावर पडत असतो. ज्यामुळे मळमळ आणि तोंडात अधिक लाळ तयार होते.

औषधांचे साइड इफेक्ट्स

काही औषधांचं सेवन जसे की, अ‍ॅंटी-बायोटिक्स, पेन किलर आणि कीमोथेरपी औषधांच्या साइड इफेक्ट्समुळेही मळमळ आणि तोंडात लाळ अधिक तयार होते.

आंबट ढेकर बंद करण्याचे उपाय

- वेलची खाऊन तुम्ही आंबट ढेकर येण्याची समस्या दूर करू शकता. जर तुम्हाला वेलची खाणं आवडत नसेल तर वेलची टाकून काढा ही घेऊ शकता. त्यात थोडा लिंबाचा रसही घालू शकता. 

- काळ्या मिठाचं सेवन तर तसं नेहमीच केलं पाहिजे. कारण याचे अनेक फायदे आहेत. काळ्या मिठाने पचनक्रिया मजबूत होते आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात. आंबट ढेकर येत असेल तर एक ग्लास पाण्यात अर्धा छोटा चमचा काळं मीठ टाका आणि हे पाणी प्या.

- जड जेवण केल्यावर अनेकदा लोक अर्धा चमचा लिंबाचा रस पितात. याने अन्न पचनास मदत मिळते. डॉक्टर्सही पोटासंबंधी समस्येत लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. आंबट ढेकर दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून सेवन करा.

- लिंबू पाण्यात पुदीना टाकू शकता. त्याशिवाय केवळ पुदीना पाणी पिऊनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. कारण पुदीना थंड असतो आणि याने पोटासंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते.

Web Title: Digestive disorders reasons and prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.