पचनसंस्था होईल मजबूत आणि स्ट्रॉंग जर लावाल 'या' सवयी, अन्यथा होतील गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 04:47 PM2021-07-13T16:47:41+5:302021-07-13T16:48:18+5:30
पोटाचे विकार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच योग्य ती काळजी घेतल्यास पोटाचे विकार होणारच नाहीत. यासाठी नियमित वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे, अवेळी न खाणे, संतुलित आहार घेणे, दररोज कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम करणे, दिवसभर भरपूर पाणी पिणे हे महत्त्वाचे आहे.
पोटाचे विकार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच योग्य ती काळजी घेतल्यास पोटाचे विकार होणारच नाहीत. यासाठी नियमित वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे, अवेळी न खाणे, संतुलित आहार घेणे, दररोज कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम करणे, दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि पोट दुखत असल्यास वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे हे कारवेच लागेल. डाएट एक्सपर्ट डॉ. रंजना सिंह यांनी झी न्युज हिंदीच्या वेबसाईटला याचे उपाय सांगितले आहेत.
फायबरचं सेवन
आपल्या आहारात तंतूमय पदार्थांचा समावेश करायलाच हवा. तंतूमय पदार्थ म्हणजे फायबरच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारून शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास (कोठा साफ होतो) मदत होते.
भरपूर पाणी प्या
दिवसाला साधारण आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवं. हे पानसंस्था व्यवस्थित राखण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. याशिवाय तुम्ही लिंबूपाणी, नारळपाणी पिऊ शकता.
शांतपणे हळूहळू खा
घाईघाईत खाताना आवश्यकतेपेक्षा अधिक खाल्लं जातं. म्हणूनच एका जागेवर शांत चित्ताने बसून खायला हवं. यामुळे पोटाला खरंच किती गरज आहे, तेवढंच खाल्लं जातं. पोट भरल्याची सूचना शरीरातील हामोर्न्स मेंदूला देतात आणि गरजेपेक्षा अधिक खाण्यापासून आपण वाचतो.
नियमित व्यायाम
खाण्याचे सगळे नियम पाळतानाच व्यायाम करण्यावरही भर असू दे. नियमित व्यायाम केल्यामुळे वजन तर नियंत्रणात राहतंच शिवाय, तुमच्या पचन संस्थेचं कामकाजही सुधारतं.