आता 'हे' कार्ड असेल तरच कोरोनाची लस दिली जाणार; PM मोदींनी दिले महत्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 01:57 PM2020-10-20T13:57:25+5:302020-10-20T14:00:55+5:30

CoronaVirus News & Latest Updates : ग्रॅन्ड चॅलेंज' च्या वार्षिक सभेला संबोधित करताना आपल्या उद्घाटन भाषणात मोदींनी सांगितले की, कोरोनाच्या माहामारीत लस विकसित करण्याच्या बाबतीत आपण सगळ्यात पुढे आहोत आणि काही लशींच्या चाचण्या शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत.

Digital health id card will be used for corona vaccination said prime minister narendra modi up | आता 'हे' कार्ड असेल तरच कोरोनाची लस दिली जाणार; PM मोदींनी दिले महत्वाचे संकेत

आता 'हे' कार्ड असेल तरच कोरोनाची लस दिली जाणार; PM मोदींनी दिले महत्वाचे संकेत

googlenewsNext

कोरोना व्हायरसने जगभरात गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस  कोरोना रुग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत असताना आता कोरोनाच्या लसीकरणाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. PM नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की, देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाअंतर्गत हेल्थ कार्ड दिले जाईल. आता २ महिन्यांनी  PM मोदींनी पुन्हा 'लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल हेल्थ आयडी वापरला जाईल' असे संकेत दिले आहेत. ग्रॅन्ड चॅलेंज' च्या वार्षिक सभेला संबोधित करताना आपल्या उद्घाटन भाषणात मोदींनी सांगितले की, कोरोनाच्या माहामारीत लस विकसित करण्याच्या बाबतीत आपण सगळ्यात पुढे आहोत आणि काही लशींच्या चाचण्या शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत.

लसीकरणासाठी डिजिटल हेल्थ कार्ड महत्वाचे

PM मोदी म्हणाले की, ''डिजिटल हेल्थ कार्डसह डिजिटल नेटवर्कचा वापर करण्यासाठी एका वितरण प्रणालीवर काम केले जात आहे. याद्वारे नागरिकांचे लसीकरण केले जाईल. भारतातील लोकांनी विविधतेने नेहमीच सर्वांना आकर्षित केले आहे. आपला देश अमेरिकेच्या लोकसंख्येच्या चौपट आहे. आपली बरीच राज्ये युरोपियन देशांइतकीच आहेत. भारतात कोरोनाचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. दुसरीकडे दररोज नवीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. भारताचा रिकव्हरी रेट 88 टक्के असून हा सर्वात जास्त आहे. हे घडले कारण जेव्हा भारतात शंभर प्रकरणं होती, तेव्हा लॉकडाऊन करणारा भारत हा पहिल्या देशांपैकी एक देश होता.'' कोरोना संसर्गामुळे शरीरावर होत आहेत 'असे' परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा, जाणून घ्या उपाय

१५ ऑगस्टच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेल्थ कार्डबाबत माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, ''प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ कार्ड दिले जाईल. हे कार्ड प्रत्येक भारतीयांच्या आरोग्य खात्याप्रमाणे काम करेल. या कार्डमध्ये  तुमची प्रत्येक चाचणी, आजार, कोणत्या डॉक्टरकडून कोणतं औषध घेतले आहे, त्याचे उपचार केव्हा घेतले, त्याचे रिपोर्ट काय आले ही सर्व बाबींचा समावेश असेल. डॉक्टरांचा वेळ घेणं, पैसे जमा करणे, दवाखान्यात प्रिस्क्रिप्शन मिळवण्यासाठी गर्दी असो, या सर्व समस्या नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या माध्यमातून अनेक समस्यांपासून लांब राहता येईल. तसंच प्रत्येक नागरिक उत्तम आरोग्यासाठी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असेल.  पॉझिटिव्ह बातमी! शास्त्रज्ञांनी शोधलं कोरोनाला नष्ट करण्याचं नवं तंत्र, आता विषाणूंची वाढ रोखता येणार

हर्ड इम्यूनिटीपेक्षा लसीकरण सुरक्षित

आरोग्य संशोधन नियतकालिक लॅसेंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर ८० वैज्ञानिक आणि संशोधकांनी हर्ड इम्यूनिटीबाबत एक जाहीर पत्र लिहिले होते.  या पत्रात नमुद केलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा अवलंब करणं कितपत सुरक्षित आहे याबाबत  पुरावे नाहीत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाला रोखण्यासाठी निर्णायक  आणि तात्काळ उपायांचा अवलंब करायला हवा. 

लॅसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन केल्यामुळे आणि इतर समारंभ रोखल्यामुळे संक्रमणाचा वेग अनेक ठिकाणी कमी झाला आहे. तर काही देशात  कोरोनाची संक्रमणाची दुसरी लाट आलेली दिसून येते. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हर्ड इम्यूनिटीच्या उपायाचा अवलंब करणं फायद्याचे ठरणार नाही.  हर्ड इम्यूनिटी अशी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये  मोठ्या समुहाला आजाराचं संक्रमण झाल्यामुळे आजाराशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात. एंटीबॉडी तयार करण्याची  हीच क्रिया लसीकरणाच्या माध्यमातूनही होऊ शकते. 

Web Title: Digital health id card will be used for corona vaccination said prime minister narendra modi up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.