रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे 'ही' बारीक पानांची भाजी, डायबिटीसवर रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 04:21 PM2022-07-24T16:21:06+5:302022-07-24T16:28:51+5:30

ही एक दाहक-विरोधी गुणधर्म असलेली भाजी आहे. मात्र ही भाजी तुम्हाला डायबिटीजमध्येही खूप फायदेशीर ठरू शकते. शेपूची भाजी खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ते कसे पुढे जाणून घेऊया...

dill leaves are extremely beneficial to control sugar and diabetes | रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे 'ही' बारीक पानांची भाजी, डायबिटीसवर रामबाण

रक्तातील शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे 'ही' बारीक पानांची भाजी, डायबिटीसवर रामबाण

googlenewsNext

शेपूची भाजी अनेक आरोग्य फायद्यांनी समृद्ध असते. ही भाजी पचनक्रियेस मदत करते आणि पोटातील अतिरिक्त गॅस कमी करते. ही भाजी मासिक पाळीच्या विकारांपासूनही आराम देते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढवते. ही एक दाहक-विरोधी गुणधर्म असलेली भाजी आहे. मात्र ही भाजी तुम्हाला डायबिटीजमध्येही खूप फायदेशीर ठरू शकते. शेपूची भाजी खाल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ते कसे पुढे जाणून घेऊया...

डायबिटीजसाठी उपयुक्त आहे शेपू
टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांसाठी शेपूची भाजी अतिशय फायदेशीर मानली जाते. हे जगभरातील सर्व संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. खरं तर, ही भाजी आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवते. म्हणजेच फ्लक्सेशन नियंत्रित करते आणि रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित करू शकते. शेपूच्या मदतीने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवता येते. जी संसर्गाच्या काळात खूप महत्वाची असते. डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे अनेक नैसर्गिक मार्ग आहेत. परंतु जर तुम्ही शेपूची भाजी खाल्ली तर त्याचा परिणाम काही दिवसात दिसून येतो. डायबिटीजच्या रुग्णांसाठी ही भाजी कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाही.

अशी खा शेपूची भाजी
शेपूची भाजी तुम्ही कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. जास्त प्रमाणात लोक शेपू भाजीच्या स्वरूपातच खातात. मात्र तुम्ही शेपूचा ज्यूस बनवून देखील पिऊ शकता. चांगल्या चवीसाठी तुम्ही यामध्ये लिंबू किंवा पुदिनादेखील घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही शेपूची भाजी पराठ्यांच्या स्टफीनगमध्येही वापरू शकता. अशा पद्धतीने शेपू खाल्यास त्याची चवही चांगली आणि मुलंही ही भाजी आवडीने खातील.

शेपूच्या भाजीचे इतर फायदे

संधिवाताच्या वेदनेपासून आराम
शेपूची भाजी दीर्घकाळापासून दाहक-विरोधी औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते, याचा अर्थ ती संधिवात आणि संधिरोग यांसारख्या रोगांमध्ये जळजळ आणि संबंधित वेदना कमी करण्यास मदत करू शकते. शेपूची भाजी प्राचीन काळापासून नेमक्या याच कारणासाठी वापरली जात आहे.

हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करते
शेपूची भाजी शरीरास पुरेसे कॅल्शियम देते, जे हाडांच्या नुकसानापासून बचाव करते. शेपूच्या भाजीमध्ये हाडांच्या खनिज घनतेच्या नुकसानीपासून संरक्षण देणारा एक महत्त्वाचा घटक आहे.

Web Title: dill leaves are extremely beneficial to control sugar and diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.