'या' 5 समस्या असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नये अननस, पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 10:56 AM2018-06-04T10:56:13+5:302018-06-04T10:56:13+5:30
या फळाची आबंत-गोड चव सर्वांसाठीच चांगली असते असे नाही. खालील काही समस्या असणाऱ्या लोकांनी अननस खाऊ नये.
अननस हे फळ अनेकजण आवडीने खातात. या फळाची आंबट-गोड चव अनेकांना आवडते. याचा रसही अधिक आवडीने सेवन केला जातो. अननसाचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. यात अॅंटीऑक्सीडेंट, फायबर, व्हिटॅमिन-ए आणि सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅगनीजसोबतच फोलेतही अधिक प्रमाणात असतं. या सगळ्या पोषक तत्वांचा आरोग्य चांगलं ठेवण्यास फायदा होते. पण या फळाची आबंत-गोड चव सर्वांसाठीच चांगली असते असे नाही. खालील काही समस्या असणाऱ्या लोकांनी अननस खाऊ नये.
1) अॅलर्जी ग्रस्त
ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल जसे की, ओठांवर सूज, घशात खवखव, स्किनवर इजा इत्यादी लोकांनी अननसाचे सेवन करु नये. जर खायचेच असेल तर अननसाचे स्लाईस करुन ते पाण्यात टाकून ठेवा आणि थोड्या वेळानंतर ते खावे. असे केल्याने त्यातील एंजाइम नष्ट होतात.
2) गर्भवती महिला
गर्भवती महिलांनी पपई खाऊ नये हे सर्वांनाच माहीत आहे. पण अलिकडे डॉक्टर गर्भवती महिलांना अननस खाण्याचीही मनाई करतात. असे सांगितले जाते की, यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो.
3) सांधेदुखी
ज्या लोकांना सांधेदुखी आहे किंवा याची लक्षणे आहेत अशांनी अननस सेवन करु नये. त्यासोबतच ज्या लोकांना जॉईंटमध्ये दुखणं असेल त्यांनीही हे फळ खाऊ नये.
4) ब्लड शुगर रुग्ण
अननस खाल्लाने ब्लड शुगर लेव्हल वाढते. यात मोठ्या प्रमाणात शुगर असतं. त्यामुळे ज्यांना डाएबिटीज आहे त्यांनी अननस खाऊ नये.
5) दातांची समस्या असणाऱ्यांनी
जर तुम्हाला दातांच्या हिरड्यांमध्ये दुखणं, दातांसंबंधी कोणतीही समस्या असेल तर त्या लोकांनी अननस खाऊ नये. या फळामुळे दातांवर पांढरी परत निर्माण होऊन दुर्गंधी येते. सोबतच कॅव्हिटीचीही भीती असते.