Health Tips : वर्कआउटनंतर तुम्हीही थंड पाणी पिता का? जाणून घ्या होणारे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 02:33 PM2022-04-16T14:33:21+5:302022-04-16T14:33:55+5:30
Drinking cold water after Workout For Health: वर्कआउट केल्यानंतर शरीराचं तापमान वाढतं. अशात जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा थंड पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान अचानक खाली येऊ लागतं.
Drinking cold water after Workout For Health: तुम्हीही वर्कआउटनंतर थंड पाणी पिता का? जर उत्तर होत असेल तर असं करणं बंद करा. कारण याने तुम्हाला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यात हार्ट अटॅकपासून वजन वाढणं यांचा समावेश आहे. हेच कारण आहे की, एक्सपर्ट मानतात की, वर्कआउटनंतर थंड पाणी पिऊ नये. चला जाणून याने शरीराला काय काय नुकसान होतात.
का पिऊ नये थंड पाणी
वर्कआउट केल्यानंतर शरीराचं तापमान वाढतं. अशात जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा थंड पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान अचानक खाली येऊ लागतं. ज्यामुळे वर्कआउटची सगळी मेहनत वाया जाते. त्यासोबतच तुम्हाला सर्दीची समस्याही होऊ लागते.
त्यासोबतच वर्कआउटनंतर थंड पाणी प्यायल्याने हार्ट रेटही वाढतो. वर्कआउट दरम्यान नसांमध्ये वेगाने ब्लड सर्कुलेशन होतं. अशा स्थितीत तुम्ही जेव्हा थंड पाणी पिता तेव्हा थंड पाण्याने नसा वेगाने थंड होतात. ज्याचा वाईट प्रभाव पडू शकतो.
वर्कआउटनंतर जसे तुम्ही थंड प्यायले तर तुम्हाला डोकेदुखीची समस्या होऊ शकते. सायनसच्या रूग्णांनी तर अजिबात थंड पाणी पिऊ नये. कारण याने तुमची समस्या आणखीन वाढू शकते. त्यामुळे वर्कआउटनंतर थंड पाणी पिऊ नये.
त्यासोबतच याने तुमच्या पचनावरही प्रभाव पडतो. हेवी वर्कआउटनंतर अचानक थंड पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात थंड-गरम स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, ज्यामुळे हार्ट अटॅक, पचनासंबंधी समस्या होण्याची शक्यता जास्त असते.