डोळ्यांचे रोग ते गंभीर आजार होण्याची शक्यता, व्हिटॅमिन ए ची कमतरता पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 12:29 PM2022-08-19T12:29:00+5:302022-08-19T12:30:02+5:30

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेची लक्षणे आणि धोके जाणून घेऊया.

diseases because of deficiency of Vitamin A | डोळ्यांचे रोग ते गंभीर आजार होण्याची शक्यता, व्हिटॅमिन ए ची कमतरता पडेल महागात

डोळ्यांचे रोग ते गंभीर आजार होण्याची शक्यता, व्हिटॅमिन ए ची कमतरता पडेल महागात

googlenewsNext

आपल्या शरीरात व्हिटॅमिन ए तयार होत नसल्यामुळे, त्याचा पुरवठा अन्नातून होतो. जेव्हा पोट हे पोषक तत्व योग्य प्रकारे शोषत नाही तेव्हा शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता उद्भवते. त्याच्या कमतरतेमुळे अंधत्व येऊ शकते. काहीवेळा त्याच्या कमतरतेमुळे काही गंभीर संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेची लक्षणे आणि धोके जाणून घेऊया.

शरीरातील अ जीवनसत्वाच्या कमतरतेची मुख्य लक्षणे

- रातांधळेपणा, कॉर्नियामध्ये कोरडेपणा, जळजळ

- कोरडी त्वचा

- वारंवार संक्रमण

- त्वचेची जळजळ

- कोरड्या डोळ्याचा कॉर्निया

- मुलांच्या हाडांचा योग्य विकास न होणे

- वंध्यत्व समस्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेचे दुष्परिणाम
जेव्हा शरीराला व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात पुरवले जात नाही, तेव्हा हळूहळू तुम्हाला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या, प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, गोवर, अगदी गंभीर स्थितीत व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन एची कमतरतादेखील होऊ शकते. अशा लोकांमध्ये अ जीवनसत्वाचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डोळ्यांशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए युक्त पदार्थांचे सेवन करा.

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेवर उपाय
क्त तपासणीद्वारे डॉक्टर अ जीवनसत्वाची कमतरता ओळखतात. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर तुम्हाला त्यासाठी भरपूर पदार्थ आणि सप्लिमेंट्सचे सेवन करावे लागेल. तेलकट मासे, कॉड लिव्हर ऑइल, शेलफिश, भाज्यांमधील हिरव्या भाज्या, भोपळा, रताळे, गाजर, चीज, दूध, फ्लॉवर, क्रीम, दूध, आंबा, पपई, टरबूज, जर्दाळू इत्यादींचे सेवन करा.

Web Title: diseases because of deficiency of Vitamin A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.