घरातील बेडशीटसुद्धा ठरू शकते इन्फेक्शन पसरण्याचं मोठं कारणं; जाणून घ्या वापराची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 10:57 AM2020-05-26T10:57:07+5:302020-05-26T11:04:30+5:30

अशा स्थितीत तुम्ही वेळोवेळी बेडशीट स्वच्छ केली नाही तर घरबसल्या विविध आजारांना निमंत्रण देऊ शकता. 

Diseases can get from dirty bed sheet and how to wash bed sheet properly myb | घरातील बेडशीटसुद्धा ठरू शकते इन्फेक्शन पसरण्याचं मोठं कारणं; जाणून घ्या वापराची योग्य पद्धत

घरातील बेडशीटसुद्धा ठरू शकते इन्फेक्शन पसरण्याचं मोठं कारणं; जाणून घ्या वापराची योग्य पद्धत

Next

लॉकडाऊनमुळे लोक घरी बसून आहे. घरी असल्यानंतर बेडवर बसून जास्तीत जास्तवेळ वेळ घालवला जातो. बसणं, झोपणं, आराम करणं, यापैकी काही करायचं नसेल तरी बेड हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. पण तुम्हाला कल्पनाही नसेल यासंबंधी लहान लहान चुका माोठ्या आजारांचे कारण ठरू शकतात. जर तुम्ही बेड किंवा बेडशीट व्यवस्थित साफ करत नसाल तर व्हायरस, बॅक्टेरियांचे संक्रमण होण्याची शक्यता असते.

अनेकदा बेडवरच स्नॅक्स खाणं, पाळीव प्राण्यांना झोपवणं, बाहेरून आल्यानंतर पाय न धुता बेडवर चढणं,  घाम आलेल्या बेडवर झोपणं, त्यामुळे अनेक जर्म्स बेडवर पसरतात. त्यासाठी साफ-सफाई असणं गरजेंच आहे. आज आम्ही तुम्हाला बेडवर स्वच्छता कशी ठेवायची याबाबात सांगणार आहोत. 

अमेरिकेत करण्यात  आलेल्या एका रिसर्चनुसार लोक २५ ते ३० दिवसांनी आपली बेडशीट धुतात किंवा बदलतात. कदाचित तुम्ही सुद्धा पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा बेडशीट धुत असाल. बेटशीटवर धूळ, माती, केसांतील कोंडा,  खाण्या पिण्याच्या वस्तू, पाळीव प्राण्याचे केस यांमुळे डोळ्यांना सहजतेने न दिसणारा कचरा जमा झालेला असतो. अशा स्थितीत तुम्ही वेळोवेळी बेडशीट स्वच्छ केली नाही तर घरबसल्या विविध आजारांना निमंत्रण देऊ शकता. 

डेड स्किन सेल्समुळे त्वचा रोग होण्याचा धोका असतो. 

तुम्हाला माहित आहे का त्वचेच्या वरच्या भागावर  मोठ्या संख्येने मृतपेशी असतात. जेव्हा तुम्ही बेडवर झोपता तेव्हा या मृतपेशी त्या ठिकाणी पडतात. यामुळे  काहीवेळानंतर बॅक्टेरियांची पैदास होते. त्यामुळे त्वचेची एलर्जी होते. एग्जिमा, फंगल इन्फेक्शन यांसारखे आजार पसरू शकतात.  पाळीव प्राण्याच्या केसांवर सुद्धा बॅक्टेरिया असतात. त्यामुळे त्वचेवर पुळ्या येणं, फंगल इन्फेक्शन पसरणं अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

उपाय 

बेडशीटमुळे होणारं आरोग्याचं नुकसान टाळण्याासाठी आठवड्यातून एकदा बेडशीट धुवा. जर घरात लहान मुलं असतील तर रोज बेडशीट बदलायला हवी.

सगळ्यात आधी बेडशीट काढून झटकून घ्या जेणेकरून त्यावरील धूळ, माती, जमीनीवर पडेल.

त्यानंतर ३० मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजवून ठेवा.

नंतर तुम्हाला वाटेल तसं वॉशिंग मशीनमध्ये किंवा हाताने स्वच्छ धुवा.

मासिक पाळी दरम्यान 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं; गंभीर समस्यांचे असू शकतात संकेत

सतत शिंका येत असतील तर कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा 'हे' उपाय वापरून निरोगी राहा

Web Title: Diseases can get from dirty bed sheet and how to wash bed sheet properly myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.