सफरचंदापेक्षा सफरचंदाचा ज्यूस ठरतो अधिक फायदेशीर; जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 03:27 PM2019-10-01T15:27:45+5:302019-10-01T15:28:29+5:30

आपण अनेकांच्या तोंडून नेहमी एक वाक्य ऐकतो की, 'दररोज एक सफरचंद खाल्याने डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही'. सफरचंद एक असं फळ आहे. जे आपलं अनेक रोगांपासून रक्षण करतं.

Diseases conditions apple juice benefits | सफरचंदापेक्षा सफरचंदाचा ज्यूस ठरतो अधिक फायदेशीर; जाणून घ्या फायदे

सफरचंदापेक्षा सफरचंदाचा ज्यूस ठरतो अधिक फायदेशीर; जाणून घ्या फायदे

googlenewsNext

आपण अनेकांच्या तोंडून नेहमी एक वाक्य ऐकतो की, 'दररोज एक सफरचंद खाल्याने डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही'. सफरचंद एक असं फळ आहे. जे आपलं अनेक रोगांपासून रक्षण करतं. तुम्ही सफरचंद खात असाल, पण कधी सपरचंदाचा ज्यूस प्यायला आहे का? सफरचंद खाण्यासोबतच त्याचा ज्यूस पिणंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. सफरचंदामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. दररोज एक सफरचंद खाल्याने तुम्ही लगेच आजारी पडत नाही. तसचं एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यायल्याने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता. नाश्त्यामध्ये तुम्ही कधीकधी सफरचंद खाण्याऐवजी त्याच्या ज्यूसचा समावेश करू शकता. सफरचंदाचा ज्यूस शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. याच्या सेवनाने आरोग्य चांगलं राखण्यासोबतच त्वचेचं आरोग्यही राखण्यास मदत होते. जाणून घ्या सफरचंदाचा ज्यूस प्यायल्याने आरोग्याला कशाप्रकारे लाभ होतो?


 
कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यासाठी 

सफरचंदाचा ज्यूस कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. यामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. त्यामुळे दररोज एका सफरचंदाचा ज्यूस प्यायल्याने शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल बॅलेन्स राहते. 

डोळे होतील हेल्दी 

व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांसाठीही सफरचंदाचा ज्यूस फायदेशीर ठरतो. दररोज सफरचंदाचा ज्यूस प्यायल्याने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि इतर समस्यांपासूनही डोळ्यांचं रक्षण होतं. 

हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 

सफरचंदामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये पॉली-फिनॉएल आणि फ्लेवेनॉएड्सही असतात. ही तत्व हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतात. हा ज्यूस प्यायल्याने शरीरामध्ये पोटॅशिअमची कमतरता भासत नाही. अशातच हृदयासाठीही सफरचंदाचा ज्यूस फायदेशीर ठरतो. 

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी 

रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झाल्याने तुम्ही लवकर आजारी पडता. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत करण्यासाठी सफरचंद खाण्याऐवजी ज्यूस पिणं अधिक फायदेशीर ठरतं. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. 

लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी

सफरचंदाचा ज्यूस शरीराची पीएच लेव्हल बॅलेन्स करण्यासाठी मदत करतो. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. दररोज एक किंवा अर्धा ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यायल्याने लिव्हरचं आरोग्य राखण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Diseases conditions apple juice benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.