झोप येत नाही का? 'हे' हेल्दी ड्रिंक्स ठरतील फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:51 PM2019-02-07T16:51:33+5:302019-02-07T16:54:12+5:30

अनेक लोकांना झोप न येणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम दिसून येतात. अनेक संशोधनांमधून सिद्ध झालेल्या रिसर्चनुसार, प्रत्येक व्यक्तीला 6 ते 7 तासांची झोप घेणं गरजेचं असतं.

Diseases conditions for better sleep these healthy drinks will give you sound sleep | झोप येत नाही का? 'हे' हेल्दी ड्रिंक्स ठरतील फायदेशीर!

झोप येत नाही का? 'हे' हेल्दी ड्रिंक्स ठरतील फायदेशीर!

अनेक लोकांना झोप न येणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम दिसून येतात. अनेक संशोधनांमधून सिद्ध झालेल्या रिसर्चनुसार, प्रत्येक व्यक्तीला 6 ते 7 तासांची झोप घेणं गरजेचं असतं. तणाव किंवा अनियमित जीवनशैलीमुळेही अनेकांना अनिद्रेच्या समस्येचा सामना करावा लागतो. थायरॉइड हार्मोन, टेस्टोस्टेरोन, कोर्टिसोल आणि ग्रोथ हार्मोन्समुळेही अनिद्रेच्या समस्येचा सामना करावा लागतो. कधी कधी हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळेही झोपेवर परिणाम होतो. परंतु काही हेल्दी ड्रिंक्सच्या मदतीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता. या हेल्दी ड्रिंक्समध्ये आढळून येणारी पोषक तत्व, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स आणि आयर्न शरीराची तणावापासून दूर करण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी मदत करतात. 

दूध 

दूधामध्ये अमिनो अॅसिड ट्रिप्टोफन असतं. जे एका कामिंग इफेक्टप्रमाणे काम करतं. हे अॅसिड डोकं शांत ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर चांगली झोप येण्यासाठी मदत करतं. अमिनो अॅसिड सेरोटोनिन नावाचा एक घटक तयार करण्यासाठी मदत करतं. जे झोप योग्य प्रमाणात येण्यासाठी मदत करतं. 

चेरी ज्यूस 

चेरी ज्यूसमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि पोटॅशिअम असतं. जे शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि त्याचबरोबर शांत झोप लागण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त सेरोटोनिन आणि मेलाटोनिनची पातळी वाढविण्यासाठीही मदत करतात. ज्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते. 

ग्रीन टी 

ग्रीन टीमध्ये फ्लेवोनॉयड आणि कॅटेचिंस नावाचं पॉलिफेनॉल्स असतं. जे झोप येण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या हार्मोन्सला बूस्ट करण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त यामध्ये अमिनो अ‍ॅसिड थियानिनदेखील मुबलक प्रमाणात असतं. जे तणाव कमी करून शांत आणि आरामदायक झोप येण्यासाठी मदत करतं. ग्रीन-टीमध्ये रिलॅक्सिंग इफेक्ट असतात. जे नसांना आराम देऊन आणि शांत झोपेसाठी जबाबदार ठरतात. 

नारळाचे पाणी 

नारळाचे पाणी एनर्जी बूस्टिंग ड्रिंक म्हणून ओळखले जाते. जे चांगली आणि पूर्ण झोप येण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असतं. जे स्नायूंना आराम देण्यासाठी मदत करतं. नारळ पाण्यामध्ये व्हिटॅमिन-बी असतं, जे तणाव कमी करून शांत झोप येण्यासाठी मदत करतं. 

Web Title: Diseases conditions for better sleep these healthy drinks will give you sound sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.