तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कारणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 11:36 AM2019-01-08T11:36:50+5:302019-01-08T11:39:40+5:30
जेव्हा वृद्ध लोक कशाचा आधार घेण्याचा किंवा काही पकडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचे हात थरथरायला लागतात.
(Image Credit : www.drweil.com)
जेव्हा वृद्ध लोक कशाचा आधार घेण्याचा किंवा काही पकडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचे हात थरथरायला लागतात. वाढत्या वयात होणारी ही एक मोठी समस्या आहे. पण जर वय जास्त नसतानाही ही हात थरथरण्याची समस्या होत असेल त्या व्यक्तीसाठी चिंतेची बाब ठरु शकते. कारण हात थरथरणे काही वेळ गंभीर आजाराचंही लक्षण असू शकतं. चला जाणून घेऊ हात थरथरण्याची समस्या होण्याची काही कारणे....
ब्लड प्रेशर - ब्लड प्रेशर कमी झाल्याने किंवा वाढल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन प्रभावित होतं. याकारणाने हात थरथरायला लागतात. शरीरात ब्लड शुगर स्तर कमी होत असल्याने स्ट्रेस वाढू लागतो, त्यामुळे हात थरथरण्याची समस्या सुरु होते.
शुगरही आहे कारण - शुगरची समस्या असणाऱ्या रुग्णांमध्येही हात थरथरण्याची समस्या बघायला मिळते. कारण जेव्हा व्यक्तीच्या शरीरात शुगर कमी होते तेव्हा स्ट्रेस वाढतो. त्यामुळे हात थरथरतात. जर तुमचेही हात थरथरत असतील आणि तुम्हाला शुगर नाहीये, तर एकदा चेकअप नक्की करा.
एनिमिया - ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते, त्यांना एनिमियाची समस्या होते. या आजारात हात थरथरणे फार सामान्य बाब आहे. एनिमियाच्या रुग्णांमध्ये कमजोरी येते, ज्या कारणाने त्यांचे हात थरथरतात.
कॉर्टिसोल हार्मोन्स - शरीरात कॉर्टिसोल हार्मोन्स वाढल्या कारणानेही स्ट्रेसचा स्तर वाढतो. त्यासोबतच व्यक्तीमध्ये चिडचिडपणा वाढतो, गोष्टी विसरु लागतो आणि हात थरथरु लागतात. त्यामुळे ब्लड सर्कुलेशन बिघडतं आणि हात थरथर करु लागतात.