केवळ बुद्धीसाठीच नव्हे, तर शरीरासाठीही वाचन उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 05:48 PM2018-12-23T17:48:11+5:302018-12-23T18:00:20+5:30

वाचन करणं फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर ते सर्वांसाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांना वाचायला आवडतं त्यांना वाचन ही लाइफ लॉन्ग प्रोसेस वाटते. तसेच अनेक मानसोपचारतज्ञांच्या मते वाचन म्हणजे, तणाव दूर करण्याचं औषध असतं.

Diseases conditions reading habit is also beneficial for health | केवळ बुद्धीसाठीच नव्हे, तर शरीरासाठीही वाचन उपयुक्त

केवळ बुद्धीसाठीच नव्हे, तर शरीरासाठीही वाचन उपयुक्त

googlenewsNext

वाचन करणं फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर ते सर्वांसाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांना वाचायला आवडतं त्यांना वाचन ही लाइफ लॉन्ग प्रोसेस वाटते. तसेच अनेक मानसोपचारतज्ञांच्या मते वाचन म्हणजे, तणाव दूर करण्याचं औषध असतं. त्यांच्या मते तुम्ही जर दररोज झोपण्यापूर्वी एक तास आधी पुस्तकाची काही पानं वाचलीत तर त्यामुळे तुमचं डोकं शांत राहण्यास मदत होते. त्याचबरोबर ताणही दूर राहतो. जाणून घेऊया वाचण्याचे फायदे...

शांत राहण्यासाठी फायदेशीर 

जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात वाचनाचा समावेश केलात तर तुम्हाला तुमचं डोकं शांत ठेवण्यासाठी मदत मिळते. कारण जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही त्या पुस्तकातील कथा वाचता. त्यावेळी तुम्हाला ती कथा आपलीशी वाटते. त्यामुळे तुम्ही सर्व टेन्शन विसरून त्या कथेचा विचार करता. त्यामुळे दररोज एक तास तरी पुस्तक वाचावं. 

मेंदूचा व्यायम 

तुम्ही शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करत असता. पण त्यावेळी अनेकदा आपण आपलं माइंड म्हणजेच मेंदूकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला कदाचितच माहीत असेल की, वाचन केल्यामुळे मेंदूचा व्यायम होतो. यामुळे फक्त मेंदूचा विकसच होत नाही तर तुमची स्मरमशक्तीही चांगली होते. सतत अशाप्रकारची प्रॅक्टिस मेंदूशी निगडीत कोणत्याही समस्येपासून सुटक करण्यासाठी मदत करते. वयोवृद्ध माणसांसाठी रिडींग थेअरपी फार उपयोगी ठरते. याव्यतिरिक्त वाचनामुळे तुमची एकाग्रताही वाढते. कारण जेव्हा तुम्ही वाचता त्यावेळी तुमचं लक्ष एका ठिकाणी केंद्रीत होत असतं. 

शब्दसाठा वाढतो

वाचन केल्यामुळे एक फायदा असा होतो की, तुमच्याकडे शब्दांचा फार मोठा साठा तयार होतो. त्यामुळे तुमचे भाषेवर प्रभुत्त्व येते. तुम्ही नवनवीन शब्द शिकता, त्यामुळे संवाद कौशल्य वाढतं आणि शब्दफेक उत्तम होते. नवीन शब्दांचा साठा तुमच्या लिखाणात भर पाडण्यासही मदत करतो. 

विश्लेषण करण्याची क्षमता वाढते

अनेकदा लोकांना एखाद्या समस्येबाबत माहीत असते परंतु त्याचं निवारण कसं करावं हे त्यांना माहीत नसतं. अधिकाधिक पुस्तकं वाचल्यामुळे तुमच्यामध्ये एखाद्या मुद्यावर किंवा विषयावर बोलण्याची, विश्लेषण करण्याची क्षमता वाढते. अशाप्रकारे जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूचा व्यायाम करता त्यावेळी संपूर्ण परिस्थिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत समजण्यासाठी परिपूर्ण असता. त्यामुळे सतत वाचन करत राहा. 

ताण कमी करते वाचनाची आवड

नियमितपणे वाचन केल्यामुळे ताण कमी होतो. कारण, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वाचता तेव्हा तुम्ही त्या गोष्टीमध्ये रमता आणि तुमचं टेन्शन, चिंता विसरून जाता. त्यामुळे झोपण्याआधी एक तास पुस्तक नक्की वाचा. 

शांत झोप लागण्यासाठी 

वाचन केल्यामुळे तुमचं डोकं शांत राहतं आणि त्यामुळे झोपदेखील शांत लागते. खरं पाहता इलेक्ट्रॉनिक्सची कृत्रिम लाइट तुमच्या मेंदूला संदेश देते की, अजुन जागं राहण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही झोपणार असता त्यावेळी एक तास आधी टेलिव्हिजन, फोन किंवा लॅपटॉप लांब ठेवून वाचन करा. 

Web Title: Diseases conditions reading habit is also beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.