जिल्हा रुग्णालयाला मिळाले न्युरो सर्जन सामान्यांना लाभ : तातडीच्या शस्त्रक्रिया शक्य
By admin | Published: April 28, 2016 12:32 AM2016-04-28T00:32:17+5:302016-04-28T00:32:17+5:30
जळगाव : जिल्हा रुग्णालयातील रिक्त वर्ग-२ च्या जागेवर न्युरो सर्जन डॉ. मनोज पाटील हे रुजू झाले आहेत. या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयात येणार्या सामान्य रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी लाभ होणार आहे.
Next
ज गाव : जिल्हा रुग्णालयातील रिक्त वर्ग-२ च्या जागेवर न्युरो सर्जन डॉ. मनोज पाटील हे रुजू झाले आहेत. या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयात येणार्या सामान्य रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी लाभ होणार आहे. जिल्हा रुग्णालयात वर्ग-२च्या रिक्त जागा आहेत. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नियुक्तीबाबत पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये बुधवारी एक वैद्यकीय अधिकारी मिळाले. विशेष म्हणजे या पदावर न्युरो सर्जन मिळाले आहेत. तसे पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये न्युरो सर्जन नसतात. मात्र याठिकाणी डॉ. मनोज पाटील यांनी तयारी दर्शविल्याने येथे न्युरो सर्जन मिळून राज्यात केवळ जळगाव जिल्हा रुग्णालयातच ही सेवा मिळू शकणार असल्याचे सांगण्यात आले. या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयात आता डोक्यात रक्तस्त्राव झालेल्या रुग्णांवर तसेच इतर तातडीच्या शस्त्रक्रिया होणे शक्य झाले आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा मोठा लाभ होऊ शकतो, असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.