Diwali Tips : 'या' छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन मनमुराद एन्जॉय करा दिवाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 10:56 AM2019-10-26T10:56:14+5:302019-10-26T11:02:36+5:30

दिवाळी हा आनंदाचा आणि रोषणाईचा सण आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. पण हा उत्सव साजरा करताना काही गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं असतं.

Diwali safety tips and healthy eating tips | Diwali Tips : 'या' छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन मनमुराद एन्जॉय करा दिवाळी!

Diwali Tips : 'या' छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन मनमुराद एन्जॉय करा दिवाळी!

Next

(Image Credit : travelogyindia.com)

दिवाळी हा आनंदाचा आणि रोषणाईचा सण आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. पण हा उत्सव साजरा करताना काही गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं असतं. अनेक फटाके फोडतात, वेगवेळगे फराळाचे पदार्थ खातात. याने गॅस, पोट फुगणे, अपचन यांसारख्या समस्या होऊ लागतात. अशात गरजेचं आहे की, तुम्ही दिवाळीला काही सेफ्टी टिप्स फॉलो कराव्या. 

दिवाळीत या गोष्टींची घ्या काळजी

१) घरात जर लहान मुले किंवा गर्भवती महिला असतील तर मोठ्या आवाजाची फटाके फोडणे टाळले पाहिजे.  फटाक्यांच्या धमाक्याने लहान मुलांसोबतच गर्भातील बाळाच्या कानावर आआणि हृदयावर वाईट परिणाम होतो. 

२) दिवाळीला वेगवेगळ्या फटाक्यांमुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा होते. इतकेच काय काही लोकांच्या डोळ्यात ठिणगी किंवा बारूदही जातं. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशावेळी डोळ्यांची काळजी घ्यावी.

(Image Credit : liebherr.com)

३) अस्थमा, श्वासांच्या आजाराने पीडित आणि हृदयरोगाने पीडित लोकांना फटाक्यांपासून दूर रहावे. तसेच उत्साहाच्या भरात जास्त तेलकट पदार्थही खाऊ नयेत.

४) दिवाळी हा मिठाईचा सण आहे. पण मधुमेह असलेल्या लोकांनी या दिवसात फार काळजी घेणं गरजेचं आहे. डायबिटीस असलेल्या लोकांनी जास्त मिठाई खाऊ नये. त्यांनी ड्रायफ्रूट्सचं सेवन करावं.  तसेच बाहेरच्या मिठाईमध्ये भेसळ असण्याचीही शक्यता असते.

५) जर तुम्हाला धुराची अ‍ॅलर्जी असेल तर धुरापासून आणि प्रदूषणापासून वाचण्यासाठी बाहेर कमी निघावे. सोबतच धुरासोबतच प्रदूषणाचे कण शरीरात जाण्यापासून रोखण्यासाठी तोंडाला रूमालही बांधू शकता.

६) लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवा. फटाके पेटवताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. फटाके घरातील अंगणात न फोडता मोकळ्या मैदानात फोडावेत. तसेच फटाके फोडण्यासाठी काचेच्या बॉटलचा वापर करणंही महागात पडू शकतं.

७) फटाके फोडताना आजूबाजूला पाण्याने भरलेल्या बादल्या ठेवा. जेणेकरून काही समस्या झाली तर वेळीच उपाय करता येतील.

खाण्या-पिण्याची काळजी

१) दिवाळी म्हटली की, खाण्या-पिण्याचीही चांगलीच चंगळ असते. पण दूध, पनीर खवा यात या दिवसात भेसळ होऊ शकते. त्यामुळे या पदार्थांची खरेदी करताना काळजी घ्यावी. फार जास्त गोड पदार्थही खाऊ नयेत, कारण याने तुमचं वजन वाढू शकतं.

२) दिवाळीत फिट राहण्यासाठी आणि सणाचा आनंद घेण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. तुम्ही मधे मधे हार्ड ड्रिंक्स किंवा सॉफ्ट ड्रिंक्सऐवजी फळांचा ज्यूस घेऊ शकता.

(Image Credit : deccanchronicle.com)

३) फिट राहण्यासाठी दिवाळीत एकदाच भरपूर खाण्याऐवजी थोडं थोडं काही वेळाच्या अंतराने खाऊ शकता. 

४) या दिवसात सकाळी लिंबू पाणी सेवन करू शकता. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतील. तसेच खाण्यात सलाद, फळांचा समावेश करा. याने डाएटही बॅलन्स राहील.

५) दिवाळीत तुम्ही वेगवेगळ्या आजारांचे शिकार होऊ शकता. लिव्हर प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम, श्वास घेण्यास अडचण या समस्या तुम्हाला होऊ शकतात. तसेच गॅस्ट्रिक प्रॉब्लेम, शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचीही समस्या होऊ शकते. 


Web Title: Diwali safety tips and healthy eating tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.