कामाच्या प्रेशरमुळे बदलतोय शुक्राणूचा डीएनए; गर्भपाताला महिला नव्हे, तर पुरुषही जबाबदार; अहवालातून माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:47 AM2024-02-23T11:47:53+5:302024-02-23T11:48:18+5:30
आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. रणधीर सिंग म्हणाले की, गर्भपाताच्या एकूण प्रकरणांपैकी २५ टक्के प्रकरणांमध्ये शुक्राणूंच्या डीएनएचे फ्रेगमेंटेशन जबाबदार असते. लाइफस्टाइल सुधारूनही याला बरे करता येईल.
नवी दिल्ली : गर्भपातासाठी केवळ महिलाच नाही, तर पुरुषही जबाबदार आहेत. क्लिनिकल केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या मॅन अँड मिस्कॅरेज अहवालानुसार, कामाचा ताण, घरगुती कलह, खराब जीवनशैली यामुळे शुक्राणूंचा डीएनए बदलत आहे. तणावासोबतच नशा हेदेखील पुरुषांच्या शुक्राणूंना नुकसान होण्याचे एक प्रमुख कारण आहे.
महिलांना गर्भधारणा होण्यात अडचणी येण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
हे टाळण्यासाठी व्यक्तीने निरोगी जीवनशैली अंगीकारणे आवश्यक झाले आहे.
२५ टक्के गर्भपाताचे हेच कारण आहे
आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. रणधीर सिंग म्हणाले की, गर्भपाताच्या एकूण प्रकरणांपैकी २५ टक्के प्रकरणांमध्ये शुक्राणूंच्या डीएनएचे फ्रेगमेंटेशन जबाबदार असते. लाइफस्टाइल सुधारूनही याला बरे करता येईल.
१० पैकी एका महिलेला गर्भपाताला सामोरे जावे लागते. २.३ कोटी गर्भपात दरवर्षी जगभरात होतात.
२.३ कोटी गर्भपात दरवर्षी जगभरात होतात.
मोबाइलमुळे शुक्राणूंवर परिणाम?
संशोधकांनी फोन आणि शुक्राणू गुणवत्ता यांच्यातील संबंधांची तपासणी केली असता त्यांना आढळले की फोनच्या वाढत्या वापरामुळे शुक्राणूंची घनता आणि संख्या कमी होत आहे.
काय कराल?
जास्त ताण घेणे टाळा
आवश्यक विश्रांती द्या
जीवनशैली सुधारा
योगासने करा
धूम्रपान टाळा
शुक्राणूंमधील डीएनए फ्रेगमेंटेशनचा फटका
शुक्राणूंच्या डीएनएमध्ये वारंवार बदल होण्याच्या कारणास शुक्राणू डीएनए फ्रेगमेंटेशन म्हणतात. रिपोर्ट्सनुसार, ही स्थिती पुरुषांमध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण करीत आहे. इतकेच नाही, तर पुरुषांच्या खराब शुक्राणूंमुळे दर सहापैकी एका महिलेचा गर्भपात होत आहे.
अशा महिलांच्या पुरुष जोडीदारांच्या तपासणीत त्यांच्या शुक्राणूंमध्ये असे रेणू आढळून आले, जे हानिकारक आहेत. शुक्राणूच्या डीएनएमध्ये बदल झाल्याचा परिणाम म्हणून मुलांमध्ये आजार निर्माण होऊ शकतात.