रोजचा थकवा आणि कमजोरीला वैतागले आहात? केवळ १० मिनिटे करा हा सोपा उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 12:15 PM2019-03-04T12:15:00+5:302019-03-04T12:15:41+5:30
आजच्या धावपळीच्या जीवनात बिझी शेड्युल मॅनेज करणं वाटतं तितकं सोपं नसतं. अनेकदा सततच्या कामामुळे आणि कामातून येणाऱ्या तणावामुळे झोप पूर्ण होऊ शकत नाही.
(Image Credit : The Australian)
आजच्या धावपळीच्या जीवनात बिझी शेड्युल मॅनेज करणं वाटतं तितकं सोपं नसतं. अनेकदा सततच्या कामामुळे आणि कामातून येणाऱ्या तणावामुळे झोप पूर्ण होऊ शकत नाही. थकवा असा येतो की, शरीर साथ देत नाही. असं वाटायला लागतं की, सगळीकडे फक्त कामच काम आहे. अशाप्रकारचा तणाव हा ऑफिसमधील कामामुळे येऊ शकतो आणि घरातील कामांमुळेही येऊ शकतो. जर तुम्हीही अशाप्रकारच्या परिस्थितीतून जात असाल आणि तुम्हाला अजिबातच कळत नाहीये की, यातून बाहेर कसं यायचं किंवा हा त्रास दूर कसा करायचा तर आम्ही तुमच्यासाठी एक उपाय आणला आहे.
बर्नआऊट आणि स्ट्रेस वेगवेगळ्या गोष्टी
(Image Credit : Great People Inside)
सर्वातआधी तर तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, बर्नआऊट म्हणजेच अकार्यक्षम आणि स्ट्रेसमध्ये फरक आहे. कारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. बर्नआऊट किंवा अकार्यक्षम होणे हे खासकरून जास्त प्रमाणात कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये बघायला मिळतं. जेव्हा तुम्ही कामामुळे फार जास्त स्ट्रेसमध्ये येता आणि तुम्हाला वाटायला लागतं की, आता सगळंकाही संपलं आहे. काही शिल्लक राहिलेलं नाही आणि शरीर थकव्याच्य अशा स्थितीत येऊन पोहोचतं की, त्यापुढे तुम्हाला काहीच करावं वाटत नाही. अशावेळी तुम्हाला केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनात्मक थकवाही जाणवू लागतो. या स्थितीला बर्नआऊट म्हटलं जातं. यात स्ट्रेसचा स्तर हा फार जास्त असतो.
स्ट्रेसमुळे खांदे आणि डोकेदुखी
(Image Credit - womenshealth.gov)
एका रिपोर्टनुसार, जगभरातील २४ टक्के लोक हे बर्नआऊटने पीडित आहेत. या लोकांना इतकं प्रेशर असतं की, त्यांना खांद्याच्या आजूबाजूला, डोळ्यांच्या आजूबाजूला आणि डोक्यावर किंवा कपाळाच्या आजूबाजूला वेदना जाणवत असतात. अशाप्रकारच्या समस्येचं वेळीच समाधान केलं नाही तर याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो आणि हे जीवघेणंही ठरू शकतं.
काय आहे स्ट्रेस दूर करण्याचा उपाय?
शरीरात असह्य वेदना होत असतील आणि बेडवरून उठायचं अजिबात मन नसेल तर शरीराला जबरदस्तीने उठवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नये. आहात तसेच बेडवर पडून काही वेळ रिलॅक्स करा आणि योगाभ्यासातील एक आसन विपरीत करनी योग करायला हवं. तणावाच्या परिस्थितीशी निपटण्यासाठी हा योगाभ्यास फार उपयुक्त मानला जातो.
कसं कराल?
हे आसन करताना तुम्हाला जमिनीवर झोपून पाय भींतीवर सरळ करायचे आहेत आणि शरीराने एल(L) शेप करायचा आहे. जेव्हाही तुम्हाला अशाप्रकारचा सहन न होणारा थकवा किंवा स्ट्रेस जाणवत असेल तेव्हा विपरित करणी आसन नक्की ट्राय करा. शरीरासोबतच डोक्यालाही आराम द्यायचा असेल तर हे आसन करणे फायदेशीर ठरू शकतं. कोणत्याही प्रकारचा थकवा, कमजोरी, स्ट्रेस आणि बर्नआऊट दूर करण्यासाठी केवळ १० मिनिटे हे आसन करावं.