काहीही करा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कधीच कमी होणार नाही वजन, हाच आहे सर्वात महत्वाचा मुद्दा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 06:28 PM2022-06-17T18:28:19+5:302022-06-17T18:36:19+5:30
Weight Loss Tips : डाएट एक्सपर्ट लवनीत बत्रा यांनी वजनी कमी करण्यासाठी रात्रीची चांगली झोप का महत्वाची यावर काही सल्ले शेअर केले आहेत.
Weight Loss Tips : काही लोकांसाठी वजन कमी करणं फारच अवघड असतं. लोक वेगवेगळे उपाय करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण बरेच लोक असे आहेत जे वजन कमी करण्याच्या प्रोसेसमधील महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अशात त्यांचं वजन काही केल्या कमी होत नाही. वजन कमी करण्याच्या प्रोसेसमधील महत्वाची बाब आहे पुरेशी झोप.
डाएट एक्सपर्ट लवनीत बत्रा यांनी वजनी कमी करण्यासाठी रात्रीची चांगली झोप का महत्वाची यावर काही सल्ले शेअर केले आहेत. त्यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी जेवढा आहार आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे तेवढीच झोपही महत्वाची आहे. एका हेल्दी व्यक्तीला रोज रात्री कमीत कमी 7 तासांच्या झोपेची गरज असते.
झोप मेंदूसाठी पोषक आहारासारखी असते. जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला झोप आहार आणि व्यायामाइतकीच महत्वाची आहे. जर तुमचं टार्गेट फॅट कमी करणं असेल तर झोप सोडणं तुमच्यासाठी नुकसानकारक आहे'.
त्यांनी सांगितलं की, पुरेशी झोप न घेतल्याने वजन वाढू शकतं. ज्यामुळे तुम्हाला फॅट लॉस करण्यासाठी इतर कोणत्याही स्ट्रॅटेजीचा फायदा मिळत नाही. पुरेशी झोप घेतली नाही तर तणावाचे हार्मोन्स आणि भूक उत्तेजित होऊ शकते. ज्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं.
- याच कारणाने कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिज्ममध्ये रूपांतर करण्याची शरीराची क्षमता कमी होऊ शकते आणि ग्लूकोजचं प्रमाणही याने वाढतं. ज्यामुळे शरीरात हाय इन्सुलिन आणि चरबी वाढते. त्या म्हणाल्या की, इन्सुलिन सेन्सिटिविटी 30 टक्क्यांपेक्षा अधिक कमी होते.
- रात्री पुरेशी झोप न घेतल्याने लेप्टिनचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे शरीरात कार्बोहायड्रेटची लालसा निर्माण होते. मग तुम्ही फास्ट फूड अधिक प्रमाणात खाता.
- तसेच कमी झोप घेतल्याने शरीराचा विकास करणाऱ्या हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं. लवनीत यांनी सांगितलं की, 'अशाप्रकारे कमी झोप चुकीचे पदार्थ खाणं, भूक आणि कॅलरीचं प्रमाण वाढणं, शारीरिक हालचाल कमी होणं तसेच वजन वाढण्याशी जुळलेली आहे'.
झोपेच्या गुणवत्तेत सुधारणेबाबत लवनीत बत्रा यांनी सांगितलं की, लोकांनी झोपण्याआधी निळ्या प्रकाशापासून वाचावं. टीव्ही, मोबाइल झोपण्याआधी बघू नये. तसेच पुस्तक वाचावे, ध्यान साधना करावी. याने झोप चांगली येईल.