चहासोबत चुकूनही खाऊ नका या गोष्टी; परिणाम ठरतील घातक...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:12 PM2021-05-26T16:12:43+5:302021-05-26T18:22:58+5:30
बरेचदा काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते...
चहा म्हणजे काही लोकांचा जीव की प्राण. काहींना तर चहा प्याल्याशिवाय दिवस सुरू झाला असे वाटतच नाही. घरात बनवल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी चहा दररोज बनवला जाणारा पदार्थ आहे. बरेचदा काही लोकांना चहा सोबत काहीतरी पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, आपण चहासोबत खात असलेल्या चुकीच्या पदार्थांमुळेदेखील शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळे असे पदार्थ शक्य तो टाळावेत.
- उन्हाळा जरी सुरु असला तरी पावसाळ्याची चाहूल लागलीच आहे. चहाबरोबर भजी म्हणजे खव्व्यांचा वीकपॉईंट पण, चहाबरोबर बेसनयुक्त तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे अत्यंत धोकादायक आहे. बहुतेक लोक चहासोबत बेसन पीठात बनवलेले तसेच तळलेले पदार्थ खातात. यामुळे आपली पाचन शक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरात पोषक तत्त्वे कमी होतात.
- चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. चहा प्याल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे आपल्या पोटात अनेक समस्या निर्माण होतात. चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या पडण्यास सुरूवात होते.
- चहाची चव वाढवण्यासाठी अनेकजण त्यात लिंबाचा रस मिसळतात. परंतु, हे मिश्रण आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. तसेच चहानंतर कोणतीही आंबट गोष्ट खाणे चुकीचे आहे.
- चहा प्यायल्यानंतर हळदीचे प्रमाण जास्त असेलेल्या गोष्टी खाऊ नयेत. कारण, चहा आणि हळदीमधील रासायनिक घटक एकत्र होऊन पचनक्रियेला नुकसान पोहचवतात. यामुळे पचनविकार होण्याचाही धोका असतो.
- चहासोबत अथवा चहा प्यायल्यानंतर कच्च्या गोष्टी खाऊ नयेत. यामुळे पोटाचे विकार संभवतात तसेच आपल्या एकंदर आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. चहासोबत अंकुरलेले धान्य आणि उकडलेले अंडे असलेले सलाड खाणे चूकीचे आहे.