अजिबात डाएट करु नका, तरीही होईल बेली फॅट कमी, कसं? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 01:45 PM2021-07-12T13:45:29+5:302021-07-12T13:46:03+5:30

चुकीच्या जीवनशैलीमुळे बेली फॅट वाढते. परंतु आपण्यास हे माहिती आहे का? की, काही सवयींचे पालन केल्याने कुठल्याही प्रकारचे डाएट न करता आपण बेली फॅट कमी करू शकतो. 

Do not do diet at all, still you can reduce belly fat, how? read to know | अजिबात डाएट करु नका, तरीही होईल बेली फॅट कमी, कसं? घ्या जाणून

अजिबात डाएट करु नका, तरीही होईल बेली फॅट कमी, कसं? घ्या जाणून

Next

वजन कमी करण्यासोबतच अनेकजण बेली फॅट कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. पोटाच्या आसपासच्या भागात जमा असलेल्या चरबीला बेली फॅट असे म्हणतात. चुकीच्या जीवनशैलीमुळे बेली फॅट वाढते. परंतु आपण्यास हे माहिती आहे का? की, काही सवयींचे पालन केल्याने कुठल्याही प्रकारचे डाएट न करता आपण बेली फॅट कमी करू शकतो. 

बेली फॅट कमी करण्यासाठी आपण दररोज जास्तीत-जास्त पोटाचे व्यायाम केले पाहिजेत. ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच दररोज रात्री जेवण झाल्यावर किमान वीस मिनिटे चालले पाहिजेत. ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होते. आपण जर पुरेशी झोप घेत नसाल तर आपले वजन वाढते. यामुळे शरीरात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि आपण जास्त कॅलरीयुक्त अन्न खातो. म्हणूनच आपल्याला किमान ७ ते ८ तासांची झोपे घेणे महत्वाचे आहे.

पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅटमुळे विशेषत: महिला मोठ्याप्रमाणावर त्रस्त असतात. यापासून दूर राहण्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. तुम्ही दररोज दोरीवरच्या उड्या मारु शकतात. चरबी कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. दररोज १५ - २० मिनिटे हा व्यायाम महिलांना चांगला फायद्याचा ठरेल. सायकल चालवणे हाही एक चांगला व्यायाम आहे.
भुजंगासन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त असे केल्याने पोट, कंबर आणि हात यांचे स्नायू बळकट होतात. हे आपले शरीर लवचिक ठेवते. भुजंगासन करण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पोटावर झोपावे लागेल. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या आणि हानवटी जमीनीवर ठेवा त्यानंतर दोन्ही हात कमरेशेजारी आणा आणि शरीर दोन्ही हाताने कमरेपासून जेवढे शक्य आहे, तेवढेवरती उचलण्याचा प्रयत्न करा. आता आपली आसन स्थिती पूर्ण झाली आहे. शक्यतो आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Do not do diet at all, still you can reduce belly fat, how? read to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.