कोणती फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नये पाणी? असं करणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:20 AM2023-03-28T09:20:11+5:302023-03-28T09:21:39+5:30
Health Tips : अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं घातक ठरू शकतं. काही अशी फळं असतात ज्यावर पाणी पिणं नुकसानकारक ठरतं. चला जाणून घेऊ कोणती फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.
Drink Water After Eating Fruits: जास्तीत जास्त लोक जेवण केल्यावर लगेच पाणी पितात. पण जेवल्यावर लगेच पाणी पिण्याची सवय चांगली नसते. तेच काही लोक फळं खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं घातक ठरू शकतं. काही अशी फळं असतात ज्यावर पाणी पिणं नुकसानकारक ठरतं. चला जाणून घेऊ कोणती फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये.
पेरू
बरेच लोक पेरू खाल्ल्यानंतर पाणी पितात. पण पेरू खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलात तर असं केल्याने तुमची पचन बिघडू शकतं. त्यामुळे पेरू खाल्ल्यावर अजिबात पाणी पिऊ नका
केळी
केळी खाल्ल्यावर सुद्धा पाणी प्याल तर हे नुकसानकारक ठरतं. याने पचनसंबंधी समस्या तर होतेच, सोबतच याने सर्दी-खोकला होण्याचीही शक्यता जास्त असते.
पेर
पेर खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं टाळलं पाहिजे. याचं कारण याने तुम्हाला सर्दी-खोकला होऊ शकतो. त्यामुळे पेर खाल्ल्यावर लगेच पाणी न पिता थोड्या वेळाने प्यावं.
सफरचंद
इतर फळांसारखंच सफरचंद खाल्ल्यावरही पाणी पिणं टाळलं पाहिजे. सफरचंदाने आरोग्याला अनेक फायदे होतात. पण हे खाल्ल्यावर लगेच पाणी प्याल तर त्यातील आवश्यक तत्व शरीराला योग्यपणे मिळू शकत नाहीत.
डाळिंब
डाळिंबामध्येही अनेक पोषक तत्व असतात. यात आयरन इतरही अनेक महत्वाचं तत्व असतात ज्याने शरीराला खूप फायदे मिळतात. पण डाळिंब खाल्ल्यावर लगेच पाणी प्याल तर हे नुकसानकारक ठरू शकतं. याने शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत.