भुट्टा खाल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, 'हा' आजार होण्याची शक्यता!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:43 PM2018-08-24T12:43:24+5:302018-08-24T12:43:45+5:30
भुट्टा खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजेच अतिरीक्त फॅटही कमी होतं. यात बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयड्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
मक्याचे भाजलेले कणीस खाणे जवळपास सर्वांनाच आवडतं. खासकरु पावसात भुट्टा खाण्याची मजा काही औरच असते. यात असलेल्या अनेक पोषक तत्वांमुळे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. यात फायबरचं प्रमाण अधिक असतं. फायबर हे अनेक दृष्टीने आपल्यासाठी फायद्याचं असतं.
भुट्टा खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजेच अतिरीक्त फॅटही कमी होतं. यात बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयड्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच कॉर्न खाल्याने हृदयासंबंधी आजार दूर राहतात. पण भुट्टा खाल्यावर तहान लागते. मात्र यावर पाणी प्यायल्यास आरोग्यास हानिकारक ठरु शकतं.
भुट्टा खाल्यावर पाणी पिण्याचे तोटे
भुट्टा खाल्यानंतर नेहमीच प्रयत्न असावा की लगेच पाणी पिऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या होऊ म्हणजेच ब्लोटिंग होऊ शकतं. यासोबतच पचनतंत्र कमजोर होण्याचाही धोका असतो. अनेकदा ही समस्या गॅस्ट्रोपॅरीसिसस या रोगाचं रुप घेते. यामुळे पोटात दुखणे आणि गॅस होणे ही समस्या होते. कधी कधी इतका त्रास होतो की, व्यक्ती जेवणही करु शकत नाही. मक्याच्या दाण्यांमध्ये कार्बोस आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा या दोन्ही तत्वांमध्ये पाणी मिसळतं तेव्हा पोटात गॅस जमा होते. ज्यामुळे पोटात दुखणे, अॅसिडीटी आणि आणखीही काही गंभीर समस्या होतात. त्यामुळे भुट्ट्यावर पाणी पिऊ नये.
किती वेळाने प्यावे पाणी?
भुट्टा खाल्यानंतर पाणी न पिण्याची गोष्ट ऐकून मग पाणी प्यायचं कधी? असा प्रश्न पडला असेल. प्रश्न योग्यही आहे. भुट्टा खाल्यानंतर साधारण ४५ मिनिटांनी पाणी प्यावे. किंवा भुट्टा खाण्याआधीही पाणी पिऊ शकता. असे केल्याने तुम्हाला होणारी समस्या होणार नाही.
भुट्टा खाण्याचे फायदे
१) कॉर्न आपल्याला होणाऱ्या सामान्य समस्या जसे की, अॅसिडीटी, बद्धकोष्ट यासाठी फायदेशीर आहे. कॉर्नमध्ये अधिकप्रमाणत फायबर असतात जे आतड्यांमधील घाण बाहेर काढतं.
२) कॉर्न प्रत्येक वयाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. कॉर्नमध्ये मॅग्नेशिअम आणि आयर्न असतात जे हाडं मजबूत करण्यासाठी उपयोगी असतात. त्यासोबतच कॉर्नमध्ये झिंक आणि फॉस्फोरस असतात जे फायदेशीर आहे.
३) कॉर्नमध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात त्याने शरीराला एनर्जी मिळते. याने तुमचा आळसही दूर होतो. जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल आणि काम करण्याचा आळस येत असेल तर आहारात कॉर्नचा समावेश करा.
४) कॉर्न तुमच्या डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण यात व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन असतं. हे खाल्याने डोळ्यांसंबंधी समस्या जसे मॅक्युलर डी जनरेशन होत नाही.