चुकूनही खाऊ नका कच्ची अंडी, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 06:40 PM2024-09-03T18:40:36+5:302024-09-03T18:40:57+5:30
Raw egg side effects : अनेक लोकांना कच्ची अंडी खायला आवडते. पण, कच्ची अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते की, नुकसान करणार? जाणून घ्या.
Side Effects of Raw Eggs Eating : अनेकांना नाश्त्यामध्ये अंडी खायला आवडते. विशेषतः स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्त सजग असणारे लोक प्रोटीनचा चांगला स्त्रोत म्हणून आहारात अंडी खातात. अंडी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जातात. वेगवेगळे पदार्थ अंड्यापासून तयार केली जातात. पण, अनेक लोक कच्ची अंडी खातात. ते चांगलं की वाईट, हेच जाणून घ्या.
तज्ज्ञांच्या मते अंड्यामध्ये जीवनसत्वे (व्हिटामिन ए, व्हिटामिन बी २, व्हिटामिन बी १२, व्हिटामिन बी ९) आणि सेलेनियम यासारखे पोषक घटक असतात. त्याचबरोबर ओमेगा ३, फॅटी अॅसिड, DHA, EPA सारखे पोषक घटकही असतात. त्यामुळे लोक अंडी खातात.
कच्ची अंडी का खाऊ नयेत?
कच्ची अंडी न खाण्याबद्दल तज्ज्ञ म्हणतात की, कच्ची अंडी आरोग्यासाठी चांगली असतात, हे एक मिथक आहे. पोटाच्या विकार उद्भवण्याची शक्यता असते, त्यामुळे कच्ची अंडी न खाण्याचा सल्ला दिला जातो.
कच्ची अंडी खाण्यामुळे पोटदुखी, गॅस, अपचन, सूज येणे यासारखा त्रास सुरू होऊ शकतो. कच्च्या अंड्याचा वास खूप उग्र असतो, त्यामुळे उलट्या होऊ शकतात. इतकेच नाही, चिडचिडपणाही होऊ शकतो. कच्ची अंडी पचवणे कठीण असते. पोटात सूज येऊ शकते आणि त्यामुळे श्वास घेताना दम लागू शकतो.
तज्ज्ञांच्या मते दररोज एका कच्च्या अंड्याचे सेवन केल्यास रोग प्रतिकारक शक्तीवरही जास्त दबाव येऊ शकतो. ज्या लोकांना अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांनी उकडून किंवा कच्च्या अंड्याचे सेवन टाळायला हवे. कच्च्या अंड्याचे सेवन करायचे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही तज्ज्ञ सांगतात.