चॉकलेट जास्त आहारी जाऊ नका !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2016 02:18 PM2016-06-22T14:18:47+5:302016-06-22T19:48:47+5:30

कोणत्याही आनंदाच्या सोहळ्यात चॉकलेट हे मोठे आवडीने खाल्ले जाते

Do not go for more chocolate! | चॉकलेट जास्त आहारी जाऊ नका !

चॉकलेट जास्त आहारी जाऊ नका !

Next

/>
चॉकलेट म्हटले तर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तरुणाईला तर याचे व्यसन आहे. परंतू, एका सर्वेक्षणातून समोर आले आहे की, चॉकलेट अफूएवढेच प्रभाव पाडू शकणारे आहे. कोणत्याही आनंदाच्या सोहळ्यात चॉकलेट हे मोठे आवडीने खाल्ले जाते. परंतु, काहीजण या चॉकलेटच्या आहारी जातात. त्यामुळे त्याचे त्यांना एकप्रकारे व्यसनच जडते. तंबाखू खाल्याप्रमाणेच चॉकलेटशिवाय काहींना चैनच पडत नाही. त्यामुळे जेवणानंतर अनेकजण चॉकलेट खाल्याशिवाय राहत नाहीत. चॉकलेट हे अंमली  पदार्था इतके च घातक ठरणारे आहे. चॉकलेट खाणाºयांच्या मेंदूमध्ये एन्केफलिन हा स्त्राव आढळून येतो. या स्त्रावाचे गुणधर्म हे एन्ड्रोफिनशी मिळते - जुळते असल्याचे सर्वेक्षणातून सांगण्यात आलेले आहे. मिशिगन युनिव्हरसिटीतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे चॉकलेट खाण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे.

Web Title: Do not go for more chocolate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.