प्रवासात हार्ट अटॅक येण्याची कारणे माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 03:14 PM2019-03-04T15:14:42+5:302019-03-04T15:15:18+5:30
तसे तर हार्ट अटॅकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. खासकरून प्रवासात याबाबत फारच जागरूक रहावं लागतं.
(Image Credit : Diet Doctor)
तसे तर हार्ट अटॅकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. खासकरून प्रवासात याबाबत फारच जागरूक रहावं लागतं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, प्रवासादरम्यान होणाऱ्या मृत्यूंमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा अधिक आहे. स्पेनमध्ये प्रस्तुत एका रिसर्चमध्ये अभ्यासकांनी यावर जोर दिला की, जर प्रवासादरम्यान आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यावर वेळीच उपचार केले तर याचे दीर्घकाळ सकारात्मक परिणाम दिसतो.
या रिसर्चचे लेखक आणि जपान यूनिव्हर्सिटीचे रायोता निशिओ सांगतात की, 'जर तुम्ही प्रवास करत असाल आणि तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे दिसली जसे की, छाती, घशात, मान, कंबर किंवा पोटात वेदना होत असतील. ज्या १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळेसाठी होत असतील तर वेळीच रुग्णवाहिकेला फोन करा.
या कारणांमुळे प्रवासात येतो हार्ट अटॅक
खरंतर फार लांबचा प्रवास करत असताना डिहायड्रेशन, पाया अखडणे, इलेक्ट्रोलाइट असंतुलन, थकवा, मळमळ होणे यांसारख्या समस्यामुळे शरीरात रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नाही. याच कारणामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
या रिसर्चमध्ये १९९९ ते २०१५ दरम्यान २ हजार ५६४ रूग्णांवर रिसर्च करण्यात आला. या सर्वांना हृदयविकाराचा झटका आल्यावर वेळीच डॉक्टर पुरवला गेला. यातील काही रुग्णांचं ऑपरेशन करून त्यांच्यात स्टेंटी टाकण्यात आली. यातील १९२ म्हणजेच ७.५ टक्के रूग्ण हार्ट अटॅकवेळी प्रवास करत होते. जे रुग्ण प्रवास करत होते ते सर्व तरूण होते. पण त्यांना एक गंभीर हृदयाचा आजार STEMI चा धोका होता. यात हृदयापर्यंत रक्त घेऊन जाणारी नळी ही ब्लॉक होते.
डॉक्टर निशिओ या गोष्टीवर जोर दिला की, प्रवासात हार्ट अटॅकनंतर मिळणाऱ्या आपातकालीन मदतीनंतर रुग्णाने लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करायला हवा. असे केल्याने त्याला भविष्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करावे लागतील.