शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून येत असतील 'असे' आवाज तर करू नका दुर्लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 11:30 AM2019-08-22T11:30:16+5:302019-08-22T11:39:36+5:30
शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून वेगवेगळे आवाज येतात. पण त्यांना सामान्य समजून दुर्लक्ष करू नये.
(Image Credit : www.medicalnewstoday.com)
तुम्ही कधी ना कधी तुमच्या शरीरातून येणारे वेगवेगळे आवाज ऐकले असतीलच. जसे की, घोरणे, पोटात गुडगुड होणे, मोठ्या श्वासांचा आवाज आणि जॉइंट्समध्ये येणारे आवाज. सामान्यपणे सगळेच या आवाजांकडे दुर्लक्ष करतात. पण अनेकदा हे आवाज काही गंभीर आवाजांचे संकेतही असू शकतात. अशात या आवाजांच्या मागे आरोग्यासंबंधी काही संकेत जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळीच तुम्ही डॉक्टरांना संपर्क करू शकाल.
कानात झिणझिण्या येणे
(Image Credit : www.medicalnewstoday.com)
फंगल इन्फेक्शन झाले असेल तर कानात आवाज येऊ लागतात. या आजाराला टिनिटस असं म्हटलं जातं. ज्यामुळे कानात आवाज येऊ लागतात.
घोरणे
(Image Credit : nautil.us)
लठ्ठपणा आणि घशातील मेम्ब्रेनमध्ये अडथळा येत असल्याने तुम्ही घोरता. याने स्लीप एप्निया, डायबिटीस आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
जॉइंट्सचा आवाज येणे
(Image Credit : www.abc.net.au)
जॉइंट्समधे असलेली हवा आणि लिक्विडमुळे अनेकदा जॉइंट्समध्ये आवाज येतात. पण असं संधीवात आणि ऑर्थरायटिसमुळेही होऊ शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
पोटात गुडगुड होणे
(Image Credit : www.doctorshealthpress.com)
पचनक्रिया होत असताना पोटातून अनेकदा असा आवाज येतो. पण जर गुडगुड आवाज येण्यासोबतच पोट फूगत असेल आणि दुखत असेल तर ही लिव्हरची समस्या असू शकते.
श्वास घेताना शिटी वाजणे
(Image Credit : www.verywellfit.com)
फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन आणि अॅलर्जीमुळे श्वास घेताना शिटीसारखा आवाज येतो. पण नेहमी असा आवाज येत असेल तर तुम्हाला अस्थमा असू शकतो. त्यामुळे वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ढेकर
(Image Credit : www.medicalnewstoday.com)
पोटातील गॅस बाहेर येण्यासाठी ढेकर येते. पण जर ढेकरसोबतच जळजळ होत असेल तर तुम्हाला गॅस्ट्रिकची समस्या होऊ शकते.
झोपताना हृदयाचे ठोके ऐकू येणे
(Image Credit : www.healthline.com)
झोपण्याआधी जास्त कॉफी सेवन केल्याने किंवा जास्त अल्कोहोलचं सेवन केल्याने हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. असं एग्जायटीमुळे होतं.