झोपताना संगीत ऐकता? वेळीच व्हा सावधान, 'हा' रिसर्च सांगतो याचे धक्कादायक तोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:18 PM2022-02-03T16:18:56+5:302022-02-03T16:21:39+5:30

तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी तर गाणी नाही ना? ऐकत असाल तर लगेच थांबवा कारण, एका संशोधनात असं समोर आलंय की, जे लोक झोपण्यापूर्वी गाणी ऐकतात (Listening to songs before going to bed) त्यांना झोप लागल्यानंतरही त्यांच्या मेंदूत ही गाणी सुरू राहतात.

do not listen songs or music while sleeping it is dangerous for your health as it disturbs sleep | झोपताना संगीत ऐकता? वेळीच व्हा सावधान, 'हा' रिसर्च सांगतो याचे धक्कादायक तोटे

झोपताना संगीत ऐकता? वेळीच व्हा सावधान, 'हा' रिसर्च सांगतो याचे धक्कादायक तोटे

googlenewsNext

संगीत ही फक्त आवड नसुन एक थेरपी आहे असं म्हटलं जातं. प्रत्येकजण आपला वेळ छान जावा या करीता त्यांच्या आवडीचं संगीत ऐकतात. पण संगीत ऐकण्याची तुमची वेळ कोणती? तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी तर गाणी नाही ना? ऐकत असाल तर लगेच थांबवा कारण, एका संशोधनात असं समोर आलंय की, जे लोक झोपण्यापूर्वी गाणी ऐकतात (Listening to songs before going to bed) त्यांना झोप लागल्यानंतरही त्यांच्या मेंदूत ही गाणी सुरू राहतात. गाणी ऐकत झोपल्यानं बाहेर गाणी बंद झाली तरी आपण झोपेत असताना आपल्या मेंदूमध्ये ही संगीताची प्रक्रिया बंद न होता सुरूच असते. रिपोर्टनुसार, संशोधनाचे निष्कर्ष 'सायकोलॉजिकल सायन्स' (Psychological Science) जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

या संशोधनामागचा उद्देश काय?
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेतील बेलर विद्यापीठातील मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सचे सहयोगी प्राध्यापक मायकेल स्कलिन यांनी हे संशोधन केलं आहे. संगीताचा झोपेवर काय परिणाम होतो, हे शोधण्यासाठी त्यांनी हे संशोधन केलं. त्यांनी सांगितलं की, एके दिवशी रात्री अचानक त्यांची झोपमोड झाली होती. त्यानंतर त्याच्या डोक्यात संगीताचा तीच धून सुरू होती, जी त्यांनी झोपण्यापूर्वी ऐकली होती. त्यानंतर त्यांनी या विषयावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला.

याचे दुष्परिणाम काय?
प्रोफेसर स्कलिन यांनी सांगितलं की, सर्वांना माहीत आहे की संगीत ऐकल्यानं छान वाटतं. ते म्हणाले की, विशेषत: तरुणांना झोपताना नियमितपणे संगीत ऐकण्याची सवय असते. परंतु, अनेकदा असं घडतं की, झोप लागल्यानंतरही संगीत मेंदूमध्ये सुरू राहतं. यामुळं झोप खराब होण्याची शक्यता असते, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

स्कलिन म्हणाले की, झोपेत असताना, आपल्या मेंदूत संगीत चालू राहतं. एका चाचणीच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला. त्यांनी सांगितलं की, अभ्यासात ५० लोकांचा समावेश करण्यात आला होता. यादरम्यान त्यांनी झोपण्यापूर्वी अनेक प्रकारचं संगीत ऐकलं आणि त्याचा झोपेवर होणारा परिणाम जाणून घेतला. त्यांनी सांगितलं की, यादरम्यान हे समोर आलंय की, जे लोक जास्त संगीत ऐकतात, त्यांची झोप खराब होऊ शकते. ते म्हणाले की, संगीत ऐकण्याची वेळही महत्त्वाची असते.

तज्ज्ञांची वेगवेगळी मतं
झोपताना शांत सुरातलं संगीत ऐकणं चांगलं असतं, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. यामुळं मेंदूला शांतता मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील रात्रीच्या वेळी (रात्रीचे प्रहर) ऐकण्याचे राग मेंदूसाठी फायदेशीर असल्याचा अनेकांचा अनुभवही आहे. अनेक मंत्र आणि स्तोत्रेही शांत झोपेसाठी म्हटली जातात. निद्रानाशाच्या विकारामध्ये त्यांचा उपयोग होतो. शांत स्वरातील बासरीचे (flute) स्वरही मनाला शांतता देतात. या संगीतामुळं रात्रीच्या झोपेनंतर सकाळीही मनाला शांततेचा अनुभव येतो.

Web Title: do not listen songs or music while sleeping it is dangerous for your health as it disturbs sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.