वॉशरूम आणि टॉयलेटमध्ये चुकूनही करू नका या 9 चुका!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 11:22 AM2018-03-31T11:22:25+5:302018-03-31T11:22:25+5:30
ऑफिस आणि घरातील वॉशरूम-टॉयलेट्सही बॅक्टेरियापासून दूर नाहीत. त्यामुळे वॉशरूम वापरताना या 9 चुका न केलेल्याच ब-या.....
सायंटिफीक अमेरिकन मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या सायंटिस फ्लोरेस जी.ई आणि त्यांच्या टीमने केलेल्या रिसर्चनुसार, वॉशरूम आणि टॉयलेटमध्ये करोडोंच्या संख्येत हानिकारक बॅक्टेरिया असतात. जे डोळ्यांनी दिसत नाही पण शरिरात जाऊन आरोग्य बिघडवतात. पब्लिक वॉशरूममध्ये खासकरून जास्त काळजी घेतली पाहिजे. याचा अर्थ घरातील वॉशरुम स्वच्छ असतातच असं नाही. ऑफिस आणि घरातील वॉशरूम-टॉयलेट्सही बॅक्टेरियापासून दूर नाहीत. त्यामुळे वॉशरूम वापरताना या 9 चुका न केलेल्याच ब-या.....
१) जास्त वेळ घालवणे:
वॉशरूममध्ये करोडों नुकसानकारक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे जास्त वेळ आत थांबल्याने यूरीन इन्फेक्शन होऊ शकतं. अशावेळी उगाच जास्त वेळ वॉशरूममध्ये घालवू नका.
२) पुस्तकं किंवा पेपर वाचणं :
टॉयलेटमध्ये बुक्स आणि वॄत्तपत्र वाचल्याने त्यावर घाणेरडे बॅक्टेरिया चिकटतात. ज्यामुळे वेगवेगळे रोग पसरतात.
३) मोबाईल वापरणे:
वॉशरूम किंवा टॉयलेटमधील हानिकारक बॅक्टेरिया मोबाईलमध्ये चिकटतात. परत तो मोबाईल वापरत असताना कान आणि तोंडाच्या माध्यमातून ते शरीरात जातात. ज्यामुळेही आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
४) सीट किंवा आरशाला हात लावणे :
वॉशरूममधील सीट आणि आरशावर लाखोंच्या संख्येने बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया अस्थमासोबत कॅन्सरलाही कारण ठरू शकतात.
५) जास्त वेळ बसणे :
टॉयलेटच्या सीटवर जास्त वेळ बसल्याने ज्वॉईंट, स्पाइन आणि हड्ड्यांशी निगडीत त्रास होऊ शकतो.
६) हात न धुणे :
वॉशरूममधून बाहेर आल्यावर हात चांगले न धुतल्यास अनेक रोगांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे केवळ लहान मुलांना हात धुण्याचे सल्ले न देता स्वत:ही ते अंगीकारले पाहिजे.
७) हॅंड ड्रायरचा वापर :
लीड्स युनिव्हर्सिटी, यूकेच्या रिसर्चनुसार, हॅंड ड्रायरमध्ये पेपर टॉवलच्या तुलनेत २७ टक्के जास्त बॅक्टेरिया असतो. त्यामुळे त्याचा वापर कमी केलेला बरा.
८) टॉयलेटमध्ये चिंतन :
अनेकांना टॉयलेटमध्ये बसून चिंतन करण्याची सवय असते. टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने निगेटिव्ह विचार येतात. डिप्रेशन आणि स्ट्रेसची समस्या आणखी वाढू शकते.
9) खुल्या साबणाचा वापर करणे:
वॉशरूममध्ये ठेवलेल्या साबणातही बॅक्टेरिया असतो. त्यामुळे त्यानेही रोग होण्याची शक्यता असते. अशात पॅक्ड लिक्विडचा वापर करा.