किडनी स्टोनच्या ‘या’ आठ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2017 02:16 PM2017-05-09T14:16:05+5:302017-05-09T19:46:05+5:30

सर्दी, खोकला, पाठदुखी, मानदुखी या आजारांची लक्षणे आपल्याला कळतात. मात्र, असे काही आजार असतात ज्यांची लक्षणं आपल्याला ठाऊक नसल्यानं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आजारातील त्रास सहन करत राहिल्याने त्याचे दुरगामी परिणाम होत राहतात. त्यातला एक गंभीर आणि भयानक त्रासदायक आजार म्हणजे किडनी स्टोन.

Do not neglect Kidney Stone's 'these' eight symptoms! | किडनी स्टोनच्या ‘या’ आठ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

किडनी स्टोनच्या ‘या’ आठ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!

Next
रोगी जीवन हाच सुखी आयुष्याचा मंत्र आहे. आपले स्वास्थ्य चांगले असेल तरच आपले आयुष्यात घडणाऱ्या  गोष्टींमध्ये रूची राहते. मग आजार कोणताही असो त्रास हा होतोच. सर्दी, खोकला, पाठदुखी, मानदुखी या आजारांची लक्षणे आपल्याला कळतात. मात्र, असे काही आजार असतात ज्यांची लक्षणं आपल्याला ठाऊक नसल्यानं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आजारातील त्रास सहन करत राहिल्याने त्याचे दुरगामी परिणाम होत राहतात. त्यातला एक गंभीर आणि भयानक त्रासदायक आजार म्हणजे किडनी स्टोन. पाहूयात, काय आहेत या आजाराची लक्षणं...

ही आहेत किडनी स्टोनची लक्षणे : 

* लघवी करताना त्रास होणे

 - किडनी स्टोनचा आजार असणाऱ्या  व्यक्तीला लघवी करत असताना प्रचंड वेदना, त्रास सहन करावा लागतो. वेळीच जर त्यावर उपचार झाले नाही तर हा आजार वाढण्याची शक्यता बळावते. हा त्रास जास्त काळ सहन केल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.


                                                        

* पोटाच्या बाजूला त्रास होणे 
- वारंवार पोटाच्या किनाऱ्याला त्रास होतो, असे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. कधीकधी हा त्रास पाठीलाही होऊ शकतो. जास्त दिवस हा त्रास सहन केल्यास अशक्तपणा जाणवू शकतो.



*  पोटाच्या खालील भागाला वेदना
- पोटाच्या खालच्या भागाला, मांड्यांमध्ये आणि पायामध्ये जर वेदना होत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नये. कारण हा त्रास किडनी स्टोनचा असू शकतो. वेळीच सतर्क राहा.

                                                               

* त्रास कमी-जास्त होणे
 - पोटाच्या बाजूला कमी-जास्त प्रमाणात जर वेदना होत असतील आणि थोड्या थोड्या वेळाने जर असा त्रास होत आहे तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

* लघवीतून रक्त येत असेल तर...
- लघवीमुळे शरीरातील निरोपयोगी घटक बाहेर सोडले जातात. मात्र, याशिवाय अन्य घटक बाहेर येऊ लागले तर चिंतेचे कारण ठरू शकेल. उदा. लघवीतून जर रक्त येत असेल तर हे किडनी स्टोनचे लक्षण असू शकते.



* लघवीचा वास येत असेल तर...
- लघवीचा तीव्र वास येत असेल तर वेळीच सावधान होणे गरजेचे आहे. कारण, किडनी स्टोन या आजारांत लघवीचा प्रचंड घाण वास येतो. हा त्रास असलेल्यांनी लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.



* उलट्यांचा त्रास..
- वारंवार उलट्यांचा त्रास होतो का? मळमळ होण्याची चिन्हे आहेत का? मग वेळीच सावध व्हा आणि तुम्हाला किडनी स्टोन तर नाही ना याची खात्री करून घ्या...



* वारंवार लघवी येते का?
- तुम्ही कुठेही असलात तरीही तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागते का? लघवी कंट्रोल करायला त्रास होतो का? मग एकदा किडनी स्टोन तर नाही ना याची खात्री करून घ्या. 

Web Title: Do not neglect Kidney Stone's 'these' eight symptoms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.