'हे' पदार्थ पुन्हा गरम करुन खाल्ल्यानं तयार होतं विष, सेवन केल्यास द्याल मृत्यूला आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 01:49 PM2021-10-31T13:49:01+5:302021-10-31T13:54:03+5:30

काही पदार्थ असे असतात जे पुन्हा गरम केल्याने शरीराला धोकादायक (Side Effects of Reheating Foods) ठरतात, तसेच त्यांच्यातील पोषकतत्व नाहिसे होतात. कोणते खाद्यपदार्थ पुन्हा गरम करून खाणे टाळले  पाहिजे ते जाणून घेवूयात.

do not reheat this foods this food turns in poison if reheated | 'हे' पदार्थ पुन्हा गरम करुन खाल्ल्यानं तयार होतं विष, सेवन केल्यास द्याल मृत्यूला आमंत्रण

'हे' पदार्थ पुन्हा गरम करुन खाल्ल्यानं तयार होतं विष, सेवन केल्यास द्याल मृत्यूला आमंत्रण

googlenewsNext

जेवणानंतर शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि नंतर गरम करून खातो. परंतु काही पदार्थ असे असतात जे पुन्हा गरम केल्याने शरीराला धोकादायक (Side Effects of Reheating Foods) ठरतात, तसेच त्यांच्यातील पोषकतत्व नाहिसे होतात. कोणते खाद्यपदार्थ पुन्हा गरम करून खाणे टाळले  पाहिजे ते जाणून घेवूयात.

सेलेरी पुन्हा गरम करू नका
सेलेरी (Celery) मध्ये नायट्रेटची मात्रा जास्त असते. जर तुम्ही ती दोन ते तीनवेळा गरम केली तर ती टॉक्सिक होते. हे टॉक्सिक शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे.

बीट पुन्ह गरम करू नका
बीटची (beetroot) भाजी करत असाल तर ती पुन्हा गरम करू नका. यात नायट्रेट असते जे पुन्हा गरम केल्याने नष्ट होते.

भात पुन्हा गरम करू नका
एफएसएनुसार, भात (Rice) पुन्ह गरम करून खाल्ल्याने फूड पॉयजनिंग होऊ शकते.

मशरूम पुन्हा गरम केल्याने होते विषारी
मशरूममध्ये (mushroom) प्रोटीन खुप जास्त असल्याने पुन्हा गरम केल्याने त्यांची संरचना बदलते. जे शरीरासाठी हानिकारक आहे.

पालकची भाजी पुन्हा करू नका गरम
फ्रिजमध्ये ठेवलेली पालकची भाजी (palak vegetable) पुन्हा गरम करून खाणे टाळा यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यातील नायट्रेट तत्व पुन्हा गरम केल्याने हानिकारक होते. (Side Effects of Reheating Foods)

तेल करू नका वारंवार गरम
एकच तेल (Oil) वारंवार गरम करून वेगवेगळे पदार्थ तळणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे सर्वात जास्त नुकसान हृदयाचे होते. कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते.

बटाटे वारंवार गरम केल्यास होईल हा आजार
बटाट्याची (potato) शिल्लक राहिलेली भाजी दोन ते तीनवेळा गरम करून खाल्ल्यास शरीरासाठी खुप नुकसानकारक आहे. यामध्ये बॅक्टेरियामुळे बोटूलिज्म पॉयझन तयार होते. जे शरीराच्या नर्व्हजवर अटॅक करते. श्वास घेण्यास त्रास, मांसपेशीमध्ये पॅरालिसीस, इतकेच नव्हे तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

Web Title: do not reheat this foods this food turns in poison if reheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.