टॉन्सिलच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी टाळा या चुका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 11:43 AM2018-08-11T11:43:30+5:302018-08-11T11:43:44+5:30
टॉन्सिलमध्ये होणारं इन्फेक्शन हे हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे होतो. चला जाणून घेऊ कोणत्या चुकांमुळे तुम्ही टॉन्सिलचे शिकार होता.
टॉन्सिलायटिस किंवा टॉन्सिल ही घसाशी संबंधित आजार आहे ज्यात घशाच्या दोन्ही बाजून सूज येते. सुरुवातीला घशाच्या दोन्ही बाजूंना वेदना होतात आणि पुन्हा पुन्हा ताप येतो. टॉन्सिलमुळे आरोग्यासंबंधी आणखीही काही समस्या होतात. टॉन्सिलमध्ये होणारं इन्फेक्शन हे हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे होतो. चला जाणून घेऊ कोणत्या चुकांमुळे तुम्ही टॉन्सिलचे शिकार होता.
जेवणाआधी हात न धुने
जर जेवणाआधी तुम्हा हात स्वच्छ करत नसाल तर तुम्हाला टॉन्सिलचा त्रास होऊ शकतो. कारण टॉन्सिलचं इन्फेक्शन हानिकारक बॅक्टेरियामुळे पसरतात. अशात हातांवर असलेल्या बॅक्टेरिया जेवणासोबत तुमच्या घशात जातात जे टॉन्सिलच्या आसपास चिकटतात आणि इन्फेक्शनचं कारण बनतात. त्यासोबतच पोटाचेही काही विकार होतात.
उष्ट खाण्याची सवय
अनेकजण एकमेकांचं उष्ट खाण्यात फरक करत नाहीत. त्यांचा असा समज असतो की एक ताटात जेवल्याने किंवा उष्ट खाल्याने प्रेम वाढतं. पण हे विसरलं जातं की, प्रत्येक व्यक्तीच्या लाळेमध्ये बॅक्टेरिया असतो. त्यामुळे एकमेकाच्या तोंडातील बॅक्टेरिया तुमच्या तोडांत गेल्याने इन्फेक्शन होतं. यानेही टॉन्सिलची समस्या होते.
मसालेदार आणि गरम पदार्थांचं सेवन
खूप जास्त मसालेदार पदार्थ खाल्यानेही टॉन्सिलची समस्या होऊ शकते. त्यासोबतच खूप थंड किंवा गरम पदार्थ खाल्यानेही ही समस्या होते. त्यामुळे काहीही खाताना काळजी घ्या, जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका.
पाणी कमी पिण्याची सवय
कमी पाणी प्यायल्याने टॉन्सिलची समस्या होते. जेवण केल्यानंतर अन्नाचे काही कण तोंडात चिकटलेले असतात. पाण्याने गुरळा केल्यास ते कण निघून जातात. पण तसं न झाल्यास ते चिकटूनच राहतात. त्यामुळे जेवण केल्यावर १५ मिनिटांनी पाणी प्यावं आणि रोज साधारण ४ ते ५ लिटर पाणी प्यावं.
टूथब्रश लवकर न बदलणे
अनेकजण आपला टूथब्रश लगेच बदलत नाहीत आणि तो खराब झाल्यावरही वापरतात. यानेही टॉन्सिलची समस्या होते. ब्रश केल्यानंतर ब्रश धुतल्यावरही त्यात मायक्रोव्स चिकटलेले राहतात. त्यातून अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे साधारण २ ते ३ महिन्यांनी टूथब्रश बदलायला हवा.