रात्री झोप येत नाही? मधे खूपदा उठावं लागतं?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:18 PM2018-01-19T19:18:04+5:302018-01-19T19:18:48+5:30

..मग नैराश्य तुमचं दार ठोठावत असू शकतं!..

Do not sleep at night? Need to wake up often? | रात्री झोप येत नाही? मधे खूपदा उठावं लागतं?..

रात्री झोप येत नाही? मधे खूपदा उठावं लागतं?..

Next
ठळक मुद्देअगोदर रात्री अधूनमधून जाग येण्यापासून सुरू होते.हा त्रास वाढल्यानंतर त्याचं निद्रानाशात रुपांतर होतं.वेळच्या वेळी उपाय केले नाहीत, तर तुमची मानसिक स्थिती बिघडून नैराश्यही येऊ शकतं.

- मयूर पठाडे

तुम्ही रोज कष्टाचं काम किती करता?.. हे विचारतोय ते दोन कारणांसाठी. तुम्ही रोज इतके कष्ट करता का, की ज्यामुळे तुम्हाला रात्री गादीवर पडल्या पडल्या झोप येते? आणि दुसरं, तुम्ही खरंच इतकं काम करता का, की त्या थकव्यामुळे तुम्हाला झोपच येत नाही..
झोपेशीच निगडित, पण दोन अतिशय भिन्न भिन्न अशा या गोष्टी आहेत. रात्री गादीवर पडल्या पडल्या तुम्हाला झोप येत असेल, तर ते चांगलंच आहे, पण खूप थकल्यामुळे झोपच येत नाही, असंही बºयाचदा होतं. त्यामुळे खूप थकलेलं असूनही आपल्याला झोप येत नाही. हे असं जर नियमितपणे, नेहमीच होत असेल, तर मात्र ते खूपच घातक आहे.
खूप थकल्यामुळे तुम्हाला झोप येत नसेल, तर तुमचे मूड सारखे बदलतात. चिडचिडही वाढते. झोप व्यवस्थित होत नसल्यामुळे आरोग्याच्या तक्रारीही सुरू होतात.
अनेक जण झोप लागत नसल्याच्या तक्रारी करतात, पण त्याकडे गांभीर्यानं कोणीही पाहात नाही. पण त्याचे दुष्परिणाम नंतर वाढत जातात. अगोदर रात्री अधूनमधून जाग येण्यापासून सुरू होते. मधेच झोप डिस्टर्ब होते. मग तुम्ही मध्यरात्री केव्हातरी उठता. हा त्रास वाढल्यानंतर मग त्याचं निद्रानाशात रुपांतर होतं. अनेकदा ‘आॅबस्ट्रक्टिव्ह स्लीप अपेना’ हा आजारही तुम्हाला होऊ शकतो. या दोन्ही प्रकारांत आपण वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. वेळच्या वेळी त्यावर उपाय केले नाहीत, तर तुमची मानसिक स्थितीही त्यामुळे हळूहळू बिघडत जाते आणि तुम्ही नैराश्याचे शिकार होता. सततच्या नैराश्यामुळे अर्थातच तुमच्या आरोग्यावर आणि जगण्यावरच विपरित परिणाम होतात. त्यामुळे झोपेची समस्या असेल तर वेळीच काळजी घ्या.
या संदर्भात नुकत्याच झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष पाहू या पुढच्या भागात..

Web Title: Do not sleep at night? Need to wake up often?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.