डोकेदुखीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, 'या' गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 10:27 AM2019-11-19T10:27:15+5:302019-11-19T10:31:52+5:30

इंग्लंडच्या गेट्सहेडमधे २१ वर्षीय जेसिका केनला अचानक डोकेदुखी होऊ लागली होती. ती नेहमीप्रमाणे पेनकिलर टॅबलेट खाल्ली आणि ती झोपली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

Do not take headache lightly it could be symptoms of serious disease | डोकेदुखीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, 'या' गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

डोकेदुखीकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, 'या' गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Next

(Image Credit : msmwellness.com)

इंग्लंडच्या गेट्सहेडमधे २१ वर्षीय जेसिका केनला अचानक डोकेदुखी होऊ लागली होती. ती नेहमीप्रमाणे पेनकिलर टॅबलेट खाल्ली आणि ती झोपली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. जेसिकासा मेनिंगोकॉकल मेनिनजायटिस आणि सेप्टिकॅमिया नावाचे आजार झाले होते. या आजारांनीच तिचा जीव घेतला. हे एक असं इन्फेक्शन आहे ज्याने बॅक्टेरिया रक्तात मिश्रित होता आणि मोठ्या वेगाने वाढू लागतात. हे बॅक्टेरिया रक्तात टॉक्सिन रिलीज करू लागतात आणि जीवघेणे ठरू शकतात.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना डोकेदुखी, वाहतं नाक, शिंका येणे, बारीक ताप येणे यांसारख्या समस्या नेहमी होतात. पण याकडे जास्तीत जास्त लोक दुर्लक्ष करतात. पण या समस्या सतत होत असतील हा आरोग्यासंबंधी गंभीर समस्या असल्याचा इशारा आहे. वेळीच याकडे लक्ष दिलं नाही तर तुमच्यासाठी हे घातक ठरू शकतं. अशात डोकेदुखीकडे अजिबात सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. डोकेदुखीही काही गंभीर आजाराचे संकेत असू शकते. 

ब्लड क्लॉट

अनेकदा मेंदूमधे कशाप्रकारचे ब्लड क्लॉट तयार झाले तर याने सतत डोकेदुखी होऊ शकते. जर तुम्हाला कधी-कधी फार जास्त डोकेदुखी होत असेल आणि वेदना असह्य होत असेल तर आपल्या मनाने काहीही औषधे घेत बसण्याऐवजी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर यावर वेळीच योग्य ते उपचार केले गेले नाही तर हे ब्लड क्लॉट स्ट्रोकमध्ये बदलू शकतात आणि हे जीवघेणं ठरू शकतं.

ऑप्टिक न्यूरायटिस 

जर डोळ्यांच्या मागच्या बाजूला असलेल्या डोक्याच्या भागात वेदना होत असेल तर हे ऑप्टिक न्यूरायटिसचं लक्षण आहे. यात मेंदूपासून डोळ्यांपर्यंत माहिती पोहोचणाऱ्या नसांचं नुकसान होतं. ज्यामुळे तुम्हाला बघण्यात अडचण येऊ शकते आणि अनेकदा दृष्टीही जाऊ शकते. 

मायग्रेन किंवा ट्यूमर

(Image Credit : hmccentre.com)

बऱ्याच काळापासून डोकेदुखीची समस्या होत असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याने मायग्रेन, ट्यूमर किंवा नर्व्हस सिस्टीमशी संबंधित आजार होऊ शकतो. कधी-कधी जास्त दिवसांपर्यंत डोकेदुखीमुळे संवेदनशील अंगांवरही वाईट प्रभाव पडतो. ज्यामुळे या अवयवांची कार्यक्षमताही प्रभावित होते.


Web Title: Do not take headache lightly it could be symptoms of serious disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.