समाजासाठी केलेल्या प्रयत्नांची सार्वजनिक चर्चा नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:18 AM2016-01-16T01:18:06+5:302016-02-07T05:50:05+5:30

निळ्य़ा रंगाच्या सूटमध्ये नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन आकर्षणाचे केंद्र बनले होते. निमित्त होते त्यांच्या वाढदिवसाचे. 

Do not talk public about public efforts! | समाजासाठी केलेल्या प्रयत्नांची सार्वजनिक चर्चा नको!

समाजासाठी केलेल्या प्रयत्नांची सार्वजनिक चर्चा नको!

googlenewsNext
ळ्य़ा रंगाच्या सूटमध्ये नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन आकर्षणाचे केंद्र बनले होते. निमित्त होते त्यांच्या वाढदिवसाचे. अमिताभ यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला 'लोकमत'शी बच्चन यांची खास मुलाखत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सुरू झाली.
प्रश्न : तुम्ही सामाजिक उपक्रमांशी संबंधित असता. त्यांचीही चर्चा व्हायला नको का?
आम्ही समाजासाठी जे करतो तो एक छोटासा प्रयत्न असतो व ते खासगीच असावे अशी आमची इच्छा असते. त्यावर सार्वजनिकरित्या चर्चा करणे हे काही योग्य होणार नाही. जे योग्य वाटते त्याची आम्ही स्वत: मीडियाशी चर्चा करीत असतो. तुम्ही लोक आमचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करीत असता व त्यासाठी आम्ही प्रसारमाध्यमांचे आभारी आहोत.
प्रश्न : तुम्ही गुजरातच्या पर्यटनासाठी ब्रँड अँम्बेसिडॉर बनले होता तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही मोहिमेत किंवा योजनेत सहभागी होत नाही असे म्हणून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. मग आता त्याची भरपाई केली जात आहे असे समजायचे का?
नाही. आम्ही असा कधीही विचार केला नाही. हे बघा आम्ही कधीही कोणाकडे काही म्हणायला जात नाही. जो कोणी आमच्याकडे येईल व आम्हाला वेळ असतो तेव्हा आम्ही त्यासाठी नेहमीच तयार असतो. गुजरात असो की महाराष्ट्र किंवा अन्य कोणतेही राज्य किंवा केंद्र सरकारची कोणतीही योजना आम्ही असा नेहमीच विचार केला आहे की आमचा हातभार लागल्यामुळे जर काही चांगले होत असेल तर आम्ही नेहमीच तत्पर असतो. आताही तोच प्रयत्न आहे.
वाघांची घटती संख्या हा मोठय़ा काळजीचा विषय आहे व ती कमी करण्यासाठी किती तरी संघटना आणि सरकार एकत्रित प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांत प्रसार माध्यमेही सहभागी आहेत.
आम्हाला या प्रयत्नांत सहभागी होण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा आम्हालाही वाटले की यात आपलाही सहभाग असला पाहिजे. आनंदाची बाब म्हणजे याबद्दल सकारात्मक वातावरण तयार होत आहे.आम्ही नेहमीच असे म्हणत आलो आहोत की आम्ही सोबत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकत असेल तर आम्ही काम करायला तयार असतो.
आम्हाला वाहतूक पोलिसांकडून विचारणा झाल्यावर लगेच आम्ही त्यांच्यासोबत गेलो. आम्हाला पुढेही अशी कुठलीही संधी मिळाल्यास त्या प्रयत्नांत आम्ही तत्परतेने सहभागी होऊ.

Web Title: Do not talk public about public efforts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.