दातांबाबतच्या या 5 समजांवर ठेवू नका विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 12:54 PM2018-07-06T12:54:21+5:302018-07-06T12:54:41+5:30
अनेक प्रकारच्या गैरसमजूतीमुळे या अनेक समस्या होऊ लागतात. हे काय गैरसमज आहेत हे जाणून घेऊयात....
प्रत्येकालाच चमकदार पांढरे दात आणि सुंदर स्माईल हवी असते. चमकदार दात मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. वेगवेगळे घरगुती उपायही सांगितले जातात. पण यातील काही मिथकांवर अजिबात विश्वास ठेवू नये. याने तुमच्या दातांना चमक तर येणार नाहीच उलट दातांना याने नुकसान होण्याची शक्यता असते. अनेक प्रकारच्या गैरसमजूतीमुळे या अनेक समस्या होऊ लागतात. हे काय गैरसमज आहेत हे जाणून घेऊयात....
1) टूथपेस्टमुळे दात चमकतील
सगळ्यांनाच असं वाटतं की, दातांना पांढरं करणारं गम आपल्या दातांचा पिवळा रंग दूर करतील. पण हे चुकीचं मानलं गेलं आहे. कारण टूथपेस्टमध्ये काही असे रसायन असतात ज्यामुळे दातांचं नुकसान होतं.
2) फळांमुळे दात चांगले होतात
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, केळीची साल किंवा लिंबू दातांवर चोळल्यास तुमचं दात चमकदार होतील. पण सत्य हे आहे की, दातांवर ही फळांचा वापर केल्यास त्यातून एक अॅसिड तयार होतं. याने दातांच्या मजबूतूवर परिणाम होतो.
3) दात नेहमीसाठी पांढरे रहावे
हे बरोबर आहे की, तज्ज्ञांकडून दातांवर उपचार करुन घेतल्यास ते बराच काळ पांढरे राहतील. पण दात नेहमीसाठी पांढरे राहतील आणि ते कधीही पिवळे होणार नाहीत, असं होऊ शकत नाही. आपल्या खाण्याच्या सवयी आणि लाइफस्टाइलवर ते अवलंबून आहे.
4) हिरड्यांमधून रक्त येत असल्यास ब्रश करु नये
ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त निघत असेल तर डॉक्टरांना दाखवले पाहिजे. पण अनेकदा काही लोक ब्रश न करण्याचा सल्ला देतात. हा सल्ला चुकीचा आहे. ब्रश करणे बंद केल्यास दातांची समस्या आणखी वाढेल.
5) अॅस्प्रिनने दातांचं दुखणं कमी होतं
हे काहीप्रमाणात सत्य आहे की अॅस्प्रिनमुळे तुम्हाला दाताच्या दुखण्यापासून काहीकाळ दिलासा मिळतो. पण अॅस्प्रिन हिरड्या आणि दातांना नुकसानकारक आहे.