लहान मुलांसोबत घरातच करा या फनी अॅक्टिविटीज, मुलं होतील शरीराने मजबूत आणि चपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:20 PM2024-05-30T15:20:45+5:302024-05-30T15:39:24+5:30
Children Health : याचा फायदा ते मजबूत होण्यासाठी, त्यांच्यात चपळता आणि हुशारी येण्यासाठी नक्कीच होईल. याने मुलांचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.
Children Health : आपली लहान मुले नेहमीच निरोगी, फिट रहावी आणि बुद्धीमानही व्हावी असं सगळ्याच पालकांना वाटत असतं. पण यासाठी आपण काय करतो? असा एक प्रश्नही स्वत:ला विचारायला हवा. लहान मुले स्वत:हून सगळ्याच गोष्टी करतात असं नाही. काही गोष्टी त्यांच्याकडून करवून घ्याव्या लागतात. आजकाल मुलांचं मोकळ्या मैदानात खेळणं कमी झालंय आणि ते जास्तीत जास्त वेळ टीव्ही-मोबाइल बघतात. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकासही योग्यपणे होत नाही आणि त्यांचं आरोग्यही बिघडत राहतं. (Best Activities for Kids at Home)
टीव्हीवरील वेगवेगळे टॅलेंट शो पाहून सगळ्यांना वाटत असतं की, आपलं मुलही असं झालं पाहिजे किंवा त्यालाही असं काही आलं पाहिजे. तो एखाद्या खेळात तरबेज असला पाहिजे. पण असं होण्यासाठी तुमचं लहान मूल शरीराने मजबूत आणि चपळ असलं पाहिजे. असं जर तुम्हालाही वाटत असेल तर त्यांच्यासोबत काही अॅक्टिविटीज तुम्ही घरात करू शकता. मुलांच्या फायद्यासाठी तुम्ही थोडा वेळ त्यांच्याकडून काही अॅक्टिविटीज खेळता खेळता करून घेऊ शकता.
सध्या इन्स्टावर डॉ. अंकित गुप्ता यांनी एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. ज्यात एक वडील आपल्या मुलाकडून अॅक्टिविटी करून घेत आहे. या अॅक्टिविटी लहान मुलांना सहजपणे आवडतील आणि ते खेळल्यासारख्या या अॅक्टिविटी करतील. याचा फायदा ते मजबूत होण्यासाठी, त्यांच्यात चपळता आणि हुशारी येण्यासाठी नक्कीच होईल. याने मुलांचं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.
तुम्ही व्हिडीओमध्ये बघू शकता की, यात एक व्यक्ती मुलासोबत खेळत आहे. या गोष्टी मुलांसोबत केल्यातर मुलांची हाडे मजबूत होतील. त्यांचं बॅलन्स आणि शरीराचं पोश्चर सुधारेल. त्यांचा स्ट्रेस आणि चिडचिडपणा कमी होईल, तसेच त्यांचा पालकांसोबतचे संबंध चांगले मजबूत होतील. एक महत्वाचा फायदा असाही होईल की, याने मुलांचं टीव्ही आणि मोबाइल बघणंही कमी होईल. चला तर मग लागा कामाला आणि मुलांचं भविष्य उज्ज्वल करा.