टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसण्याची येणार नाही वेळ, फक्त सकाळी करा 'हे' एक सोपं काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:12 PM2024-11-13T12:12:02+5:302024-11-13T12:12:35+5:30
Constipation Cure : एक सोपा आणि फायदेशीर उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचा वापर केल्यावर तुम्हाला टॉयलेटमध्ये तासंतास बसावं लागणार नाही.
Constipation Cure : अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी रोज सकाळी टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसावं लागतं. बराच वेळ बसूनही अनेकांचं पोट साफ होत नाही. तर समजून घ्यायचं की, ही बद्धकोष्ठतेची समस्या आहे. ही समस्या सामान्यपणे चुकीची लाइफस्टाईल, फायबरची कमतरता आणि पाणी कमी प्यायल्याने होते. ही समस्या दूर करण्यासाठी औषधांचं सेवन करण्यापेक्षा काही सोपे घरगुती उपायही आहेत. असाच एक सोपा आणि फायदेशीर उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचा वापर केल्यावर तुम्हाला टॉयलेटमध्ये तासंतास बसावं लागणार नाही.
एक्सपर्टनुसार, रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने पोटाच्या मसल्सना आराम मिळतो आणि पचन तंत्र योग्य पद्धतीने काम करतं. कोमट पाण्याने आतड्यांमधील अन्न मुलायम होतं, ज्यामुळे मलत्याग करण्यास त्रास होत नाही. या उपायाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
कसा कराल उपाय?
सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे. हवं तर तुम्ही यात थोडा लिंबाचा रस किंवा चिमूटभर हळदही टाकू शकता. लिंबामधील व्हिटॅमिन सी ने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते आणि हळदीमधील अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणांमुळे पोटातील सूजही कमी होते.
बद्धकोष्ठता दूर करणारे इतर उपाय
फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन
आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश वाढवा. जसे की, ओट्स, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं इत्यादी. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
व्यायाम करा
नियमितपणे हलका व्यायाम करा. जसे की, पायी चालणे, जेवण झाल्यावर चालणे याने पचन तंत्र अॅक्टिव राहतं.
भरपूर पाणी प्या
दिवसभरातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने शरीरात पाणी कमी होत नाही आणि मलत्याग करण्यास मदत मिळते.
या सोप्या उपायांनी केवळ बद्धकोष्ठताच दूर होईल असं नाही तर तुमचं पचन तंत्रही मजबूत राहतं. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने दिवसभर एनर्जीही मिळते.