तुम्हाला माहीत आहे का लघवी करण्याची योग्य पद्धत? जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 04:27 PM2023-06-01T16:27:08+5:302023-06-01T16:27:24+5:30

जगातल्या टॉप यूरोलॉजिस्टपैकी एक असलेले डॉ. गेराल्ड कॉलिन्स हे आहे. डॉ. गेराल्ड यांनी लोकांसोबत लघवी करण्याची योग्य पद्धत शेअर केली आहे.

Do you also urinate while standing expert warns never do this mistake | तुम्हाला माहीत आहे का लघवी करण्याची योग्य पद्धत? जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणाले

तुम्हाला माहीत आहे का लघवी करण्याची योग्य पद्धत? जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणाले

googlenewsNext

मनुष्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आपलं आरोग्य जपणं. जर व्यक्ती निरोगी असेल तर तो कोणतीही समस्या आणि अडचण दूर करू शकतो. पण अनेकदा मोठा श्रीमंत व्यक्तीही आजारपणामुळे लाचार दिसू लागतो. काही असे आजार असतात जे आपल्याच चुकांमुळे होत असतात. हेल्थ एक्सपर्टने  लोकांना हे सांगून हैराण केलं आहे की, त्यांच्या लघवी करण्याच्या पद्धतीने अनेक आजार होऊ शकतात. 

जगातल्या टॉप यूरोलॉजिस्टपैकी एक असलेले डॉ. गेराल्ड कॉलिन्स हे आहे. डॉ. गेराल्ड यांनी लोकांसोबत लघवी करण्याची योग्य पद्धत शेअर केली आहे. सोबतच सांगितलं की, लघवीच्या चुकीच्या पद्धतीमुळे लोकांना अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या कामासाठीही काही पद्धत कशी असू शकते? व्यक्तीला जसं आरामदायक आणि सोपं वाटेल व्यक्ती तसा लघवी करेल. पण सांगता येत नाही की, तुमची लघवी करण्याची पद्धत अनेक आजारांना निमंत्रण देणारी असेल.

आपल्या तर्कासाठी एक्सपर्टने 13 देशातील 7 हजार पुरूषांवर सर्वे केला. यातून समोर आलं की, 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोक उभं राहून लघवी करणं पसंत करतात. ऑस्ट्रेलियामध्ये 25 टक्के पुरूष बसून तर 27 टक्के लोक उभं राहून लघवी करतात. 

जर्मनीमध्ये 40 टक्के पुरूष उभं राहून लघवी करणं पसंत करतात. डॉ. गेराल्ड यांच्यानुसार, पुरूषांनी नेहमी बसून लघवी केली पाहिजे. याने बराच फायदा होतो. असं केल्याने पेल्विक मसल्स आणि स्पाइन रिलॅक्स राहतात. त्यासोबतच अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तर तुम्ही कशी लघवी करता?

Web Title: Do you also urinate while standing expert warns never do this mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.