जेवल्यानंतर तुम्ही या 6 गोष्टी करता का? मग त्या आधी थांबवा!

By Admin | Published: May 5, 2017 04:19 PM2017-05-05T16:19:18+5:302017-05-05T16:50:06+5:30

जेवणानंतर आपण काय करतो हे जरा तपासून पाहा. कारण जेवणानंतरच्या सहा अशा सवयी ज्या आनंद देतात पण आरोग्याच्या दृष्टीनं त्या अतिशय घातक असतात.

Do you do these 6 things after eating? Then stop that before! | जेवल्यानंतर तुम्ही या 6 गोष्टी करता का? मग त्या आधी थांबवा!

जेवल्यानंतर तुम्ही या 6 गोष्टी करता का? मग त्या आधी थांबवा!

googlenewsNext

 

आपण रोज अशा अनेक गोष्टी करत असतो ज्या आपल्या रोजच्या सवयीचा भाग असतात. आणि सवय म्हटली की ती जशी चांगली असते तशी वाईटही. अनेक सवयींमधून आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळत असतो पण आनंद मिळतो म्हणून या सवयी चांगल्याच असतात असं नाही. उलट काही सवयी नुसत्या वाईट असतात असं नाही तर धोकादायकच असतात. जेवणानंतर आपण काय करतो हे जरा तपासून पाहा. कारण जेवणानंतरच्या सहा अशा सवयी ज्या आनंद देतात पण आरोग्याच्या दृष्टीनं त्या अतिशय घातक असतात. तेव्हा आरोग्यदायी जगायचं असेल तर जेवणानंतरच्या या पाच गोष्टी तातडीनं थांबवायला हव्यात.

1. जेवणानंतर चहा कॉफीचे कप

अनेकांना सकाळ दुपारच्या जेवणानंतर लगेच चहा कॉफी प्यायची सवय असते. यामुळे अनेकांना विशेषत; दुपारच्या वेळेस ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं. पण ही सवय अत्यंत घातक आहे. मुळातच चहा कॉफीमध्ये टॉक्सिन्स असतात. आणि जेवल्यानंतर लगेच चहा कॉफी प्यायलानं हे टॉक्सिन्स अन्नातील घटकांना शरीरापर्यंत पोहोचूच देत नाही. विशेषत: लोह आणि प्रथिनं या अन्नघटकांना शरीरापर्यंत पोहोचण्यास चहामुळे अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्तींच्या शरीरात लोहाची कमतरता असते त्यांनी तर ही सवय लगेच मोडावी. जेवणानंतर साधारणत: तासाभरानं चहा प्यायला तर चालतो.

 

   

 

 

Web Title: Do you do these 6 things after eating? Then stop that before!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.