उन्हाळ्यात दररोज एक्सरसाइज करता का?; 'या' 5 गोष्टी लक्षात घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 07:37 PM2019-04-22T19:37:50+5:302019-04-22T19:39:35+5:30

उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फिट राहण्यासाठी आणि बॉडी शेपमध्ये ठेवण्यासाठी दररोज एक्सरसाइज करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर शरीराचं तापमान वाढतं.

Do you exercise everyday in summer then know these 5 essential rules | उन्हाळ्यात दररोज एक्सरसाइज करता का?; 'या' 5 गोष्टी लक्षात घ्या 

उन्हाळ्यात दररोज एक्सरसाइज करता का?; 'या' 5 गोष्टी लक्षात घ्या 

googlenewsNext

(Image Credit : avantikumarsingh.com)

उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फिट राहण्यासाठी आणि बॉडी शेपमध्ये ठेवण्यासाठी दररोज एक्सरसाइज करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर शरीराचं तापमान वाढतं. यामुळे एक्सरसाइज करणं आवघड होतं. जास्त घाम आल्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. अशावेळी जर एक्सरसाइज केली तर तुम्ही आजारीही पडू शकता. काही लोक जास्त उकाड्यामुळे एक्सरसाइज करण्याचं टाळतात. यामुळे त्यांची फिटनेस खराब होते. फिट रहायचं असेल तर रेग्युलर एक्सरसाइजही गरजेची आहे. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यातही आरामात एक्सरसाइज करू शकता. 

सकाळी एक्सरसाइज करा 

प्रयत्न करा की, तुम्ही सकाळी 6 वाजताच तुमचं वर्कआउट करून घ्याल. बाहेरील तापमान 8 ते 9 वाजेपर्यंत फार गरम होतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून एकसरसाइज करून घ्या. त्यामुळे दिवसभराची सर्व आवश्यक काम आटपू शकता. 

एक्सरसाइजनंतर आंघोळ करू नका

काही लोक एक्सरसाइज केल्यानंतर लगेच बाथरूममध्ये आंघोळीसाठी जातात. परंतु एक्सरसाजनंतर काही वेळ आराम करणं गरजेचं असतं. जेणेकरून शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होईल. जवळपास एक तासानंतर आंघोळ करणं ठिक आहे. 

पाणी भरपूर पिणं असतं गरजेचं

उन्हाळ्यामध्ये एक्सरसाइज करताना फार घाम येतो. एक्सरसाइज करताना मुबलक प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. त्यानंतर एक्सरसाइज करा. एक्सरसाइज करताना मध्येच तहान लागली तर पाणी प्या. यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणार नाही. त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही. 

एनर्जी ड्रिंक पिणं टाळा

व्यायाम करताना एनर्जी ड्रिंकचं सेवन करणं शक्यतो टाळा. एनर्जी ड्रिंक्समध्ये ग्लूकोज अधिक असतं. जे शरीरामध्ये जाऊन एनर्जीमध्ये कनवर्ट होतं. जर तुम्ही वजन घटवण्यासाठी किंवा बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी एक्सरसाइज करत असाल तर शरीरामध्ये जमा झालेल्या फॅट्सऐवजी शरीर एनर्जी ड्रिंक्समधून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करतात. त्यामुळे तुम्हाला एक्सरसाइजचा पूर्ण फायदा मिळणार नाही. तुम्ही एनर्जी ड्रिंकऐवजी पाणी पिऊ शकता. 

सैल कपडे परिधान करा 

जिम असो किंवा घर, कधीही टाइट कपडे वेअर करून वर्कआउट करू नका. सैल आणि हलक्या रंगाचे कपडे परिदान करा. कपडे शरीराला चिकटल्यामुळे प्रचंड उकडतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एक्सरसाइज करताना सैल आणि घाम लवकर सुकेल असे कपडे वेअर करा. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं. 

Web Title: Do you exercise everyday in summer then know these 5 essential rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.