थंडीच्या दिवसात प्रचंड आळस येतो? एकदा हे उपाय करून बघाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 12:12 PM2022-11-08T12:12:19+5:302022-11-08T12:14:16+5:30
आळस माणसाचा शत्रु आहे हे आपण ऐकत आलोच आहोत. आळस आला तर कामेही वेळेवर पूर्ण होत नाहीत. मात्र या सवयीमुळे तुम्ही वेगळ्याच आजारांना निमंत्रण देऊ शकता.
थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. या दिवसात सकाळी लवकर उठायचा प्रचंड आळस येतो. अंथरुणातून उठावं असं वाटतच नाही. आळस माणसाचा शत्रु आहे हे आपण ऐकत आलोच आहोत. आळस आला तर कामेही वेळेवर पूर्ण होत नाहीत. मात्र या सवयीमुळे तुम्ही वेगळ्याच आजारांना निमंत्रण देऊ शकता. जास्तच झोपून किंवा लोळून राहिलात तर तुमचे वजन वाढू शकते स्थुलता येऊ शकते. त्यामुळे आळस झटकून लवकर कसे उठाल याचाच प्रयत्न करा.
थंडीत जास्त झोपण्याची इच्छा का होते ?
थंडीमध्ये दिवस लहान असतात. अशावेळी शरिरात स्लीप हार्मोन्सची (sleep hormones) निर्मिती होते. परिणामी आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते. सकाळी थंडी अधिक असल्याने झोपून राहावेसे वाटते.
कसा दूर करता येईल आळस ?
गजर लावून झोपा
झोपताना गजर लावूनच झोपा आणि गजर चा आवाजही मोठा ठेवा. गजराच्या आवाजाने नाही म्हणले तरी झोपमोड होतेच. मात्र गजर बंद करुन काही वेळाने उठू असे म्हणत झोपून राहू नका. थोड्यावेळाने उठू असे म्हणत कधी तासाभराची झोप होईल कळत नाही.
व्यायाम
सकाळी उठल्यावर व्यायाम करणे सर्वात चांगला उपाय आहे. व्यायाम केल्याने पुढे दिवसभर प्रसन्न वाटते. घराबाहेर पडून मैदान, पार्क किंवा बागेत व्यायाम करायला गेलात तर झोपही जाते आणि शरिराची हालचालही होते.
दुपारची झोप टाळा
दुपारी झोपण्याची सवय असेल तर ती आधी बंद करा. दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप येत नाही. रात्री उशिरा झोपल्याने सकाळी लवकर उठवत नाही. त्यामुळे दिनचर्या बिघडते. तसेच दुपारी झोपल्याने सुस्ती येते. त्यामुळे दुपारची झोप कटाक्षाने टाळावी.
रात्री झोपताना दिनचर्येची यादी बनवा
नवीन दिवस कसा सुरु करणार आहात, तुमची काय काय कामे असणार आहेत, कोणाकोणाला भेटायचे आहे हे रात्रीच लिहून ठेवा. यामुळे डोक्यात चक्र सुरु राहील की तुमचा दुसरा दिवस व्यस्त असणार आहे.