काय आहे 'कडलिंग' किंवा 'टच थेरपी'? जाणून घ्या फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 10:42 AM2019-01-16T10:42:44+5:302019-01-16T10:46:31+5:30
वाढत्या जबाबदाऱ्या धावपळ आणि अपेक्षांचं ओझं यामुळे दिवसेंदिवस जगभरातील लोकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढतंय.
वाढत्या जबाबदाऱ्या धावपळ आणि अपेक्षांचं ओझं यामुळे दिवसेंदिवस जगभरातील लोकांमध्ये तणावाचं प्रमाण वाढतंय. या तणावात अशा व्यक्तीची गरज असते जी प्रेमाने मिठी मारेल. याचं महत्त्व काही लोकांना समजलं आणि यातून 'टच थेरपी' किंवा 'कडलिंग' सारख्या प्रोफेशनला सुरुवात झाली. भारतात 'स्पर्श चिकित्सा' फार पूर्वीपासून आहे. आता या कडलिंग आणि टच थेरपीच्या माध्यमातून लोक लाखोंची कमाई करत आहेत.
काय आहे टच थेरपी?
प्राचीन आध्यात्मिक पद्धतींमध्ये टच थेरपी म्हणजे स्पर्श चिकित्सेचं महत्त्व मानलं आहे. स्पर्श चिकित्सा प्राण शक्तीवर आधारित मानली जाते. ब्रम्हांडातील प्रत्येक जीवाचं पोषण करणारीच शक्ती स्पर्श चिकित्सेत ऊर्जेच्या रुपाने काम करते. याबाबत ऋग्वेदातही उल्लेख मिळतात. डोक्यावर हात फिरवून आशीर्वाद देण्यापासून ते मालिश या गोष्टी स्पर्श चिकित्सेचा भाग आहेत. आपण लहान मुलांना प्रेमाने मिठी मारतो, असे केल्याने त्यांना आपली सकारात्मक ऊर्जा मिळते. जपानमध्ये याचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झाला. याला रेकी म्हटलं जातं. तसेच चीनमध्ये याला ची असं म्हटलं जातं. तर रशियातील लोक याला बायोप्लामिज्मिक ऊर्जा म्हटलं जातं.
नकारात्मक ऊर्जेला आपल्या सकारात्मकते द्वारे नष्ट केलं जाऊ शकतं. ही ऊर्जा हातांच्या माध्यमातून येते. स्पर्श चिकित्सा एक आध्यात्मिक चिकित्सा पद्धती आहे. याच्या मदतीने तणावमुक्त होता येतं.
रॉबिनने स्पर्शाला केलं प्रोफेशन
अमेरिकेतील कान्सासमध्ये राहणारी रॉबिन स्टीनने लोकांना मिठी मारुन लाखोंची कमाई करत आहे. रॉबिन स्टीन लोकांनी मिठी मारुन त्यांचा तणाव दूर करते. याबाबत रॉबिन सांगते की, ती लोकांनी मिठी मारुन किंवा आलिंगन देऊन ती टच थेरपी देते. याने लोकांच्या जीवनातील तणाव दूर होतो. रॉबिन अमेरिकेतील एक प्रोफेशनल आणि प्रसिद्ध कडलिस्ट आहे. ती एका तास मिठी मारुन टच थेरपी देण्याचे ८० डॉलर(५६०० रुपये) शुल्क आकारते. या प्रोफेशनला कडलिंग/स्नगलिंग असं म्हटलं जातं. ती तिच्या वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या क्लाइंटशी संपर्क करते. रॉबिनचे हे करताना काही नियम आहेत. रॉबिन सांगते की, संपूर्ण कपडे परिधान करुनच लोकांना मिठी मारते.
कसा होतो तणाव दूर?
रॉबिन ही ४८ वर्षांची आहे आणि तिने कडलिस्ट होण्यासाठी पूर्ण ट्रेनिंग घेतलंय. ती ही थेरपी करण्यासाठी आठवड्यातील जवळपास ४५ तास खर्ची करते. रॉबिनचं मिठी मारण्याचं एक सेशन १ तासांपासून ते ४ तासांपर्यंत असतो. यादरम्यान ती केवळ मिठी मारते. क्लाइंटही मिठी मारण्या व्यतिरिक्त काही करु शकत नाहीत. रॉबिन सांगते की, या कामाने तिला आनंद मिळतो. मिठी मारल्याने स्ट्रेस दूर होतो. रॉबिनच्या क्लाइंट्समध्ये अविवाहित, विवाहित, घटस्फोटीत, वयोवृद्ध प्रत्येक प्रकारचे लोक आहेत.
स्पर्श चिकित्सा ते कडलिंग पार्टी
स्पर्श चिकित्सा ही तशी फार जुनी पद्धत आहे आणि जगभरात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. पण अशाप्रकारे एखाद्याला मिठी मारुन टच थेरपी देण्याचं चलन काही वर्षांपासूनच सुरु झालं आहे. २००३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये कडलिंग पार्टीचं चलन सुरु झालं होतं. आज इंटरनेटवर शेकडो कडलिंग वेबसाईट्स आहेत. ज्या अशा सेवा देतात.