सिमला मिरचीचे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 04:49 PM2018-07-30T16:49:26+5:302018-07-30T16:50:44+5:30
कोणताही पदार्थ किंवा सलादमध्ये आवर्जून वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे सिमला मिरची. घरामध्ये तयार केलेले भाजी असो किंवा रेस्टॉरंटमध्ये बनवण्यात आलेले चायनीज, प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्याचे काम सिमला मिरची करते.
कोणताही पदार्थ किंवा सलादमध्ये आवर्जून वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे सिमला मिरची. घरामध्ये तयार केलेले भाजी असो किंवा रेस्टॉरंटमध्ये बनवण्यात आलेले चायनीज, प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्याचे काम सिमला मिरची करते. परंतु ही सिमला मिरची चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात सिमला मिरचीचे आरोग्याला होणारे फायदे...
1. सिमला मिरचीच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत होते. सिमला मिरचीमधील गुणकारी तत्त्वांमुळे हृदयाच्या शिरा बंद होत नाहीत. कारण यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे आहारामध्ये सिमला मिरचीचा समावेश केल्यानं हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
2. पोटांचे विकार, अपचन, अॅसिडिटी किंवा गॅस यांसारख्या समस्यांवर सिमला मिरची गुणकारी ठरते.
3. सिमला मिरचीमधील पोषक तत्त्व कॅन्सरसारख्या रोगापासून शरीराचा बचाव करण्याचे काम करतात. यामधील गुणधर्म शरीरातून कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर असतात.
4. सिमला मिरचीचे सेवन केल्यानं त्वचेची आद्रता टिकून राहते. तसेच हाडे मजबूत होण्यासाठीही सिमला मिरची फायदेशीर असते.
5. सिमला मिरचीचा आहारात समावेश केल्यानं शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने शरीरात कॅलरीचे प्रमाण वाढत नाही तसेच कोलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.
6. सिमला मिरचीमध्ये केयेन्न नावाचे प्रमुख तत्त्व असून ते शरीरातील वेदना कमी करतं.