मशरूम खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 12:47 PM2018-07-23T12:47:44+5:302018-07-23T12:50:40+5:30
मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असते. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते.
मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असते. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. तसेच मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटही असून यामुळे शरीरातील वाढत्या वयाच्या लक्षणं दिसत नाहीत. याव्यतिरिक्त मशरूममध्ये कोलीन नावाचं एक खास पोषक तत्त्व आढळतं. जे स्नायूंची सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. जाणून घेऊयात मशरूमचे आरोग्यदायी फायदे...
- मशरूममध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. त्याचा त्वचेसाठी तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो.
- मशरूममध्ये कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते.
- व्हिटॅमिन 'डी' साठी मशरूम हा उत्तम पर्याय आहे. व्हिटॅमिन 'डी' हाडांच्या मजबुतीसाठी फार गरजेचं असतं.
- मशरूममध्ये कमी प्रमाणात कोलेस्टेरॉल असते. त्यामुळे मशरूम खाल्यानं फार भूक लागत नाही.
- कॅन्सरच्या पेशींवर आळा घालण्यासाठीही मशरूम उपयुक्त ठरते. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की, मशरूम खाल्यानं कॅन्सरपासून शरीराचा बचाव होतो.