गरम पाणी पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:35 PM2018-08-15T16:35:37+5:302018-08-15T16:36:21+5:30

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Do you know the Healthy Benefits of drinking hot water | गरम पाणी पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

गरम पाणी पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का?

googlenewsNext

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. पण असं करण्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फिट राहण्यासाठी ज्याप्रमाणे वर्कआउट गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणीही गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दिवसातून किमान एकदा तरी गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जाणून घेऊयात गरम पाण्याचे आरोग्यदायी फायदे...

चांगल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातूनही असे सिद्ध झाले आहे की, गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक खराब तत्व बाहेर टाकण्यात येतात. 

1. ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांनी गरम पाणी पिणं फार फायदेशीर ठरतं. गरम पाणी रक्तप्रवाह वाढवून ब्लडप्रेशर नियंत्रित करतं. गरम पाणी प्यायल्याने अनेक रोगांपासून शरीराचा बचाव होतो. 

2. चेहऱ्यावरील वाढत्या सुरकुत्यांमुळे आपण फार कमी वयातच म्हातारे दिसू लागतो. त्या सुरकुत्या आपल्या शरीरात असणाऱ्या खराब घटकांमुळे होतात. त्यामुळे या सुरकुत्या दूर करण्यासाठी गरम पाणी पिणं हा उत्तम पर्याय आहे. 

3. अनेकदा चेहऱ्यावरील पिम्पलच्या समस्यांमुळे मुली आणि मुलं वैतागलेली असतात. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी सकाळी अनोशापोटी गरम पाणी पिणं गरजेचं असतं. 

4. ज्या लोकांना भूक लागत नसेल त्यांनी देखील गरम पाणी पिणं लाभदायक असतं. एक ग्लास गरम पाण्यामध्ये काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी प्यायल्याने भूक न लागण्याची समस्या दूर होते. 

5. त्वचेच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी गरम पाणी रोज पिणं हा उत्तम पर्याय आहे. दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. 

6. तुम्हाला ताप आला असेल तरिदेखील गरम पाणी पिणं फायदेशीर असतं. तसेच गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या समस्याही दूर होतात. अनेक आजार आपल्याला पोट साफ न झाल्यामुळे होतात. त्यामुळे पोट साफ होणं हे शरीरासाठी फायदेशीर असतं. 

7. दररोज एक ग्लास पाणी प्यायल्याने वाढलेलं वजन कमी होतं. तसेच पाण्यामध्ये लिंबू टाकून घेणं अधिक गुणकारी ठरतं. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वढते. तसेच त्यामुळे पोटदुखीही कमी होते. 

Web Title: Do you know the Healthy Benefits of drinking hot water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.